शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
4
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
5
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
6
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
7
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
8
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
9
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
11
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
12
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
13
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
14
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
15
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
16
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
17
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
19
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...

ऑनलाईन नाव नोंदणीनंतरच मिळणार वाहन चालविण्याचा परवाना

By admin | Updated: September 1, 2014 23:35 IST

बोगस लाभार्थ्यांना बसणार आळा

वाशिम: वाहन व चालकांच्या सुरक्षिततेसाठी नवनवे उपक्रम अमलात आणणार्‍या उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) लर्निंग लायसन्स (शिकाऊ अनुज्ञप्ती) मिळविण्याकरिता आता ऑनलाईन नावनोंदणीचा पॅटर्न अनिवार्य केला आहे. लर्निंग लायसन्स मिळविण्याकरिता द्याव्या लागणार्‍या परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाईन नाव नोंदणी (अपाईंटमेंट) करणे बंधनकारक केले आहे. या नियमांची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होणार आहे.रस्ते अपघाताची संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून, चालकांची वाहतूक नियमांची उजळणी करून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ऑनलाईन चाचणी परीक्षा गत काही महिन्यांपूर्वी सुरू केली आहे. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एकच गर्दी करतात. परिणामी, अनेकांना कार्यालयात तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे वेळ तसेच ङ्म्रम वाया जातात. बरेचवेळा नागरिकांचा दिवस खर्ची पडतो. लर्निंग लायसन्सच्या परीक्षेकरिता उमेदवारांचा वेळ, पैसा व श्रम वाचविण्याच्या दृष्टिकोनातून ह्यऑनलाईन अपॉईन्टमेंटह्ण ही सुविधा अंमलात आणण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाच्या विचाराधीन होता. याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर लर्निंग लायसन्सच्या परीक्षेकरिता ऑनलाईन नावनोंदणी करण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आली आहे. ऑनलाईन नावनोंदणीद्वारे लर्निंग लायसन्ससाठी द्याव्या लागणार्‍या परीक्षेची तारीख व वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य उमेदवारांना बहाल करण्यात आले होते. १ सप्टेंबर २0१४ पासून ऑनलाईन नावनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. ऑनलाईन नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनाच लर्निंंग लायसन्सची परीक्षा देता येणार आहे. यामध्ये इच्छुक उमेदवार लर्निंग लायसन्स चाचणीकरिता आपल्या सोईनुसार दिवस व वेळ निवडू शकतील. त्यामुळे नागरिकांना परिवहन कार्यालयात रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. एका दिवसाला सात उमेदवारांना नोंदणी करता येईल. सकाळी १0 ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १ व दुपारी १ ते २ अशा चार वेळेत परीक्षा देण्याचा पर्याय अर्जदारांना निवडता येणार आहे.ह्यडब्लूडब्लूडब्लू.सारथी.एनआयसी.इन या संकेतस्थळावर जाऊन ह्यइश्यू ऑफ लर्निंंग लायसन्स टू मीह्ण हा पर्याय अर्जदाराने निवडावा. हा पर्याय निवडल्यानंतर स्क्रीनवर उपलब्ध झालेल्या अर्जात संपूर्ण माहिती भरावी. तसेच, उजव्या बाजूला अर्ज क्रमांक (अँप्लिकेशन नंबर) असल्याची खात्री करुन तो लिहून घ्यावा व नंतर त्या क्रमांकाने अर्जातील माहिती भरावी. एलएल टेस्ट फॉर ऑनलाईन अँप्लिकेशनवर क्लिक करावे. स्क्रिनवर वेब अँप्लिकेशन नंबर व जन्मतारीख टाकल्यास आपल्या सोयीची तारीख व वेळ निवडण्याची मुभा अर्जदाराला मिळू शकणार आहे.