शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने एक खिडकी योजना राबविण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 13:43 IST

 वाशिम - आगामी गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर महावितरणने एक खिडकी योजना राबवून तातडीने गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना केल्या.आगामी ‘गणेशोत्सव व बकरी ईद’च्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बुधवारी सायंकाळी प्रशासकीय आढावा घेतला. सण, उत्सव साजरे करताना सर्व समाजबांधवांनी प्रशासनाला ...

  •  

    वाशिम - आगामी गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर महावितरणने एक खिडकी योजना राबवून तातडीने गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना केल्या.

    आगामी ‘गणेशोत्सव व बकरी ईद’च्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बुधवारी सायंकाळी प्रशासकीय आढावा घेतला. सण, उत्सव साजरे करताना सर्व समाजबांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहण्याची गरज आहे.  नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील सर्व मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या उत्सव मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच सर्व मंडळांनी महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीज जोडणी घ्यावी. यासाठी महावितरणने एक खिडकी योजना राबवून मंडळांना त्वरित वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना द्विवेदी यांनी दिल्या.

    २५ आॅगस्ट पासून सुरु होत असलेला गणेशोत्सव व या दरम्यान येणारी बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सवोर्तोपरी सज्ज आहे. सर्व समाजातील नागरिकांनीही हे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सव काळात डॉल्बीच्या वापरावर बंदी असून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. उत्सव काळात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी यावेळी सांगितले.