शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत खड्ड्यांमुळे अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 16:24 IST

मिरजेत गांधी चौक ते बसस्थानक या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातात दुचाकीस्वाराचा बळी गेला. स्टेशन चौकात ड्रेनेज यंत्रणा खचल्याने लावलेल्या बॅरिकेटस्ला दुचाकी धडकून निवृत्त रेल्वे तिकीट तपासनीस पी. बी. ऊर्फ पायण्णा बाबूराव कोळी (वय ७२, रा. वखारभाग, मिरज) आठ दिवसांपूर्वी जखमी झाले होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देमिरजेत खड्ड्यांमुळे अपघातात एक ठारअंधारात बॅरिकेटस् न दिसल्याने अपघात

मिरज : मिरजेत गांधी चौक ते बसस्थानक या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातात दुचाकीस्वाराचा बळी गेला. स्टेशन चौकात ड्रेनेज यंत्रणा खचल्याने लावलेल्या बॅरिकेटस्ला दुचाकी धडकून निवृत्त रेल्वे तिकीट तपासनीस पी. बी. ऊर्फ पायण्णा बाबूराव कोळी (वय ७२, रा. वखारभाग, मिरज) आठ दिवसांपूर्वी जखमी झाले होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.मिरजेत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिकेचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. स्टेशन रस्ता व बसस्थानक चौकात ड्रेनेज यंत्रणा दुरूस्तीसाठी गेले महिनाभर महापालिकेने बॅरिकेटस् लावले आहेत.

मिरज रेल्वेस्थानकात चौकशी खिडकीत प्रवाशांना माहिती देण्याचे काम करणारे निवृत्त तिकीट तपासनीस पी. बी. कोळी आठ दिवसांपूर्वी रात्री दुचाकीवरून घरी परत येत असताना स्टेशन चौकातील बॅरिकेटस्ला धडकून रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना, मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.राष्ट्रीय महामार्गात समावेश झालेल्या गांधी चौक ते बसस्थानक या मोठ्याप्रमाणात वाहतूक असलेल्या या प्रमुख रस्त्याची पावसाने चाळण झाली आहे. बसस्थानक चौकात रस्त्यावरील विक्रेते, हातगाड्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होते.

या चौकात वारंवार ड्रेनेज यंत्रणेची दुरुस्ती करण्यात येत असल्याने रस्त्याच्या मधोमध बॅरिकेटस् लावण्यात आले आहेत. यामुळे स्टेशन चौकात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रात्रीच्या अंधारात बॅरिकेटस् न दिसल्याने कोळी यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगलीmiraj-acमिरज