शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यातील एक दिवस स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 17:47 IST

 वाशिम - स्पर्धेच्या युगात विद्यार्थी मागे राहू नये म्हणून वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयाने गत पाच वर्षांपासून आठवड्यातील एक दिवस ‘जनरल नॉलेज : स्टुडन्ट आॅफ दी वीक’ हा उपक्रम हाती घेतलेला आहे.

- संतोष वानखडे 

 वाशिम - स्पर्धेच्या युगात विद्यार्थी मागे राहू नये म्हणून वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयाने गत पाच वर्षांपासून आठवड्यातील एक दिवस ‘जनरल नॉलेज : स्टुडन्ट आॅफ दी वीक’ हा उपक्रम हाती घेतलेला आहे. दर गुरूवारी सूचना फलकावर १० प्रश्न देऊन उत्तरे शोधून आणणाºया विद्यार्थ्याला शिक्षकाकडून स्पर्धा परीक्षेची पुस्तकेही मोफत दिली जातात.स्पर्धेच्या युगात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये म्हणून विविध उपक्रम राबविले जात आहे. असाच एक उपक्रम पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयात गणित शिक्षक हरीष चौधरी यांनी हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने इतर व्यावहारीक ज्ञान मिळावे, स्पर्धा परीक्षेची माहिती बालवयातच मिळावी यासाठी गत पाच वर्षांपासून ‘जनरल नॉलेज  : स्टुडन्ट आॅफ दी वीक’ हा उपक्रम राबविण्यात येतो.यामध्ये आठवड्यातील दर गुरुवारला १० प्रश्न सुचना फलकावर लावण्यात येतात. या प्रश्नांची उत्तरे सहा दिवसात शोधावी लागतात. उत्तरे शोधताना विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची अनेक पुस्तके हाताळतात. यामधून विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीपासूनच स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण होते. या उपक्रमात जवळपास ४५० ते ५०० विद्यार्थी सहभागी होतात. यामधून एक  विजेता ठरविला जातो व त्याला स्पर्धा परीक्षेचे २०० ते ३०० रुपये किंमतीचे पुस्तक मोफत दिले जाते. वर्षभरात जो जास्तीत जास्त वेळा विजेता ठरेल त्याला दोन हजार रुपयांचे पारीतोषिकही २६ जानेवारीला मान्यवरांचे हस्ते देण्यात येते. या उपक्रमाचे जनक हरीष चौधरी यांना संस्थाध्यक्ष रामभाऊ चौधरी, सचिव केशवराव चौधरी, सेवानिवृत्त प्राचार्य सोपानराव कांबळे, प्राचार्य बाबाराव राठोड, रामेश्वर ढोबळे व बंडु वाघमारे यांच्यासह अन्य शिक्षकांचेही सहकार्य लाभत आहे. परिसरात या उपक्रमाचे कौतूक होत आहे.

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षा