शिरपूर जैन (जि. वाशिम): शेतातील गोदामातून अज्ञात चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम साहित्य लंपास केले. ही घटना १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान शेलगाव राजगुरे येथील विनोद नारायणराव वाघ यांच्या शेतात घडली. विनोद देशमुख हे मंडप डेकोरेशन व साऊंड सिस्टीमचा व्यवसाय करतात. मंडप डेकोरेशन व साऊंड सिस्टीमचे साहित्य शेतातील गोदामात ठेवत असत. या साहित्यापैकी चार साऊंड कॉलम, दोन एम्लिफायर व इतर साहित्य असा दीड लाखाचा ऐवज एका वाहनात नेऊन चोरट्यांनी पोबारा केला. यावेळी विनोद देशमुख यांचा विशाल नामक भाचा तेथे झोपलेला होता. वाहन सुरू झाल्याच्या आवाजाने तो झोपेतून जागा झाला असता वाहनाचा क्रमांक दिसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दीड लाखाच्या साहित्याची चोरी
By admin | Updated: December 14, 2015 02:32 IST