शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

५ महिन्यांत ५८४ तक्रारींचा ‘ऑन दी स्पाॅट’ निपटारा, शिबीरांची फलश्रृती

By सुनील काकडे | Updated: October 21, 2023 15:10 IST

पोलिस-जनता सलोखा कार्यक्रम

सुनील काकडे

वाशिम : नागरिक आणि पोलिसांमध्ये सुसंवाद कायम राहावा, त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून त्या सोडविता याव्या. यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी पोलिस प्रशासन सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्यानुषंगाने गत ५ महिन्यांमध्ये पोलिस दलाने चार विशेष शिबीरे घेवून ५८४ नागरिकांच्या तक्रारींचा ‘ऑन दी स्पाॅट’ निपटारा केला. अशाप्रकारे तत्काळ न्याय मिळत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अन्यायग्रस्त नागरिकांना तक्रार निवारणासाठी पोलिस स्टेशनमध्ये सतत चकरा माराव्या लागू नये, त्यांच्या समस्यांवर तोडगा काढून तक्रारींचे विनाविलंब निवारण व्हावे, या हेतूने शिबीरांची संकल्पना पुढे आली. त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

याअंतर्गत चालूवर्षी ५ जून रोजीला आयोजित शिबिरात २३१, २५ जुलै रोजी ८४, २६ ऑगस्टला २१३ आणि तीन दिवसांपूर्वी, १८ ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या शिबिरातून ५६ अशा एकंदरित ५८४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या.पोलिसांवरील ताणही तुलनेने झाला कमी

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये आणि पोलिस स्टेशन स्तरावर विविध स्वरूपातील तक्रारी प्रलंबित राहतात. त्या निकाली काढण्यासाठी तक्रारदारांकडून तगादा लावला जातो. मात्र, आता प्रत्येक महिन्यांत शिबीर घेवून तक्रारी निकाली निघत असल्याने तक्रारदारांचे समाधान होण्यासोबतच पोलिसांवरील ताणही तुलनेने कमी झाला आहे.

नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, अडचणींच्या निवारणासाठी स्थानिक पोलिस स्टेशनला भेट द्यावी. तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे.- बच्चन सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम