रिसोड (जि. वाशिम) : आमदार आदर्श गाव विकास उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी तालुक्यातील बाळखेड येथे भेट देऊन बुधवारी गावकर्यांशी संवाद साधला. यावेळी विविध योजनांतून गावचा विकास कसा साधला जाणार आहे, याचे महत्त्व गावकर्यांना पटवून दिले. आमदार आदर्श गाव उपक्रमातून आमदार अमित झनक यांनी बाळखेड गावाची निवड केली असून, गावच्या विकासात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी २७ जानेवारीला बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार अमित झनक, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार अमोल कुंभार, सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोडचे कोरडे, तालुका कृषी अधिकारी तांबिले, महावितरणचे उपअभियंता पाठक, सहायक अभियंता आर.आर. नाईक. सामाजिक वनीकरणचे उबाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वाघ, बांधकामचे शाखा अभियंता लोलुरे, सहाय्यक निबंधक कोकाटे, नेतन्सा येथील डॉ.संतोष बाजड, काँग्रेस नेते महेश गणगणे, अजित सिंह, अंशुमन देशमुख, चेतन कोंडाणे, विशाल इंगळे, बबन पाटील गारडे आदी उपस्थित होते. यावेळी महावितरण, कृषी, बांधकाम, पंचायत, तहसील, सामाजिक वनीकरण, महसूल आदी विभागाशी निगडीत असलेल्या समस्यांचा तातडीने निपटारा तसेच गावाच्या सर्वांंगीन विकासासाठी विविध योजनेतून निधी उपलब्ध केला जाईल, असे आमदार झनक व अधिकार्यांनी गावकर्यांना सांगितले. विकासात्मक कामांना गावकर्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी गावकर्यांना सांगितले.
अधिका-यांनी साधला गावक-यांशी संवाद !
By admin | Updated: January 27, 2016 23:25 IST