शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा येथे शासकीय कापूस खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 15:27 IST

२ डिसेंबर रोजी कारंजा येथील तिरूमला कॉटन प्रोसेसिंग फॅक्टरी मध्ये शासकीय कापूस खरेदी शुभारंभ करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : खुल्या बाजारात कापसाचे दर पडल्याने पणन महासंघाच्यावतीने कापसाची शासकीय खरेदी सुरू करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला. त्यानुसार, कारंजा येथे कापसाची शासकीय खरेदी २ डिसेंबरपासून सुरू झाली असून, तीन दिवसात १ हजार क्ंिवटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी १२ टक्क्यापेक्षा कमी मॉईश्चरची अट घालण्यात आली आहे. सततचे बदलते वातावरण, पावसातील खंड, पडलेले बाजारभाव व अपेक्षित उत्पादनात येणारी घट या कारणांमुळे शेतकऱ्यांनी अलिकडे खरीप हंगामातील पारंपारिक पिकांना बगल देत आपला मोर्चा मान्सूनपूर्व कपासी लागवडीकडे वळविल्याने कपासीच्या क्षेत्रात वाढ झाली. परिणामी उत्पादनही वाढले. परंतु खुल्या बाजारात गरजेपेक्षा जास्त कापूस विक्रीसाठी आल्याने खासगी व्यापाऱ्यांनी कापसातील आद्रतेचे प्रमाण अधिक असल्याचे कारण पुढे करून कापसाचे दर पाडले. यावर उपाय म्हणून शासनाने हमीभावाने कापसाची खरेदी सुरू केली. २ डिसेंबर रोजी कारंजा येथील तिरूमला कॉटन प्रोसेसिंग फॅक्टरी मध्ये शासकीय कापूस खरेदी शुभारंभ करण्यात आला. २ ते ५ डिसेंबर या तीनदिवसात सदर खरेदी केंद्रावर १ हजार क्ंिवटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. खरेदीसाठी कापसात ८ टक्के आर्द्रता असल्यास हमी दराने तर ८ ते १२ टक्के आद्रता असल्यास भावात कपात करून कापसाची खरेदी करणे सुरू आहे. तर १२ टक्क्यापेक्षा अधिक आर्द्रता निघाल्यास तो कापूस खरेदी केल्या जाणार नाही, अशी माहिती ग्रेडर उमेश यश जानोरकर यांनी  बोलताना दिली. खरेदी करण्यात आलेल्या कापसाला ५ हजार ५० रूपयापर्यंत दर देण्यात येत आहे.खुल्या बाजारात कापूस ५ हजाराच्या आत विकल्या जात असल्याने शेतकरी आपला कापूस शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणत असल्याचे दिसून येत आहे.

१२ टक्के आर्द्रतेची अट रद्द करण्याची मागणीपणन महासंघाच्यावतिने सुरु केलेल्या कापूस खरेदीमध्ये १२ टक्के आद्रतेची अट रद्द करण्याची मागणी शेतकºयांतून केली जात आहे. या अटीमुळे शेतकरी अडचणीत सापडले असून ही अट रद्द केल्यास शेतकºयांच्या हिताचे होईल असे शेतकºयांमध्ये बोलल्या जात आहे.

टॅग्स :Karanjaकारंजाcottonकापूस