शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, पदाधिकाऱ्यांनीच फिरविली कृषी महोत्सवाकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:09 IST

वाशिम : येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित जिल्हा कृषी महोत्सवास अधिकारी, पदाधिकाºयांनीच पाठ फिरविल्याचे २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या उदघाटनावरुन दिसून आले.

वाशिम : येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित जिल्हा कृषी महोत्सवास अधिकारी, पदाधिकाºयांनीच पाठ फिरविल्याचे २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या उदघाटनावरुन दिसून आले. योग्य नियोजनाअभावी सकाळी ११ वाजता नियोजित असलेले उदघाटन तब्बल ७.३० तास उशिरा संध्याकाळी ६.३० वाजता करण्यात आले.प्रकल्पसंचालक आत्मा अंतर्गंत जिल्हयात मोठा गाजावाजा करीत २१ फेब्रुवारीपासून २५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड तर अध्यक्ष म्हणून गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील होते. तर प्रमुख अतिथीमध्ये राज्यमंत्री मदन येरावार, खासदार संजय धोत्रे, विधानपरिषद सदस्य श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदाताई देशमुख, खासदार भावनाताई गवळी, विधान परिषद सदस्य गोपिकीशन बाजोरीया, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना, विभागीय कृषी सहसंचालक एस.के. नागरे, कृषी सभापती विश्वनाथ सानप होते. यापैकी केवळ जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदाताई देशमुख, जिल्हाधिकारी मोडक व कार्यक्रमाचे विनीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसान ेयांचीच केवळ उपस्थिती लाभली होती. डझनभर पाहुण्यांना आमंत्रित करुनही  नेहमी शेतकºयांप्रती सहानुभूती दर्शविणाºया महत्वाच्या अधिकारी व पदाधिकाºयाने हजेरी लावली नाही. याबाबत शेतकºयांमध्ये उलट-सुलट चर्चा होतांना दिसून येत आहे. एक पदाधिकारी व दोन अधिकारी उपस्थितउदघाटन कार्यक्रमासाठी डझनभर पदाधिकाºयांची उपस्थिती राहणार असल्याची पत्रिका प्रकाशित करण्यात आली त्यामधील केवळ एक पदाधिकारी उपस्थित राहू शकले तर चार प्रमुख अतिथी असलेल्या अधिकाºयापैकी केवळ एक अधिकारी उपस्थित राहलेत. जे एकमेव अधिकारी उपस्थित होते तेच त्या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा होते हे विशेष! प्रगतशिल शेतकºयांना केले प्रमुख मान्यवरकृषी महोत्सवास प्रमुख मान्यवरांची अनुपस्थिती पाहता वेळेवर महोत्सवात आलेल्या प्र्रगतशील शेतकरी गरदडे, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त दिलीप फुके यांनाच प्रमुख मान्यवर करुन मंचावर बसविण्यात आले. कृषी सभापतींचीही अनुपस्थितीजिल्हा परिषद कृषी सभापती विश्वनाथ सानप यांचीही यावेळी अनुपस्थिती दिसून आली. परंतु त्यांच्या आईची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते हजर राहू शकले नसल्याची माहिती आहे. कारण हा कार्यक्रम व्हावा यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला होता.