शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास अधिकारी मिळत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी ठोकले मेडशी ग्रामपंचायतीला कुलूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 17:14 IST

ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून १७ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.

मेडशी (वाशिम) : येथील ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून १७ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. येथे कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी सरपंच रेखा संतोष मेटांगे यांच्यासह उपसरपंच, सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे वारंवार मागणी केली होती.मेडशी येथील ग्रामविकास अधिकारीपदाचा प्रभार अन्य ग्रामसेवकांकडे सोपविला होता. ते नियमित गावात येत नसल्याने घरकुलांचे प्रस्ताव, अतिक्रमण नियमानुकूल प्रकरणे, अन्य अहवाल, शौचालयांची कामे आदी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाली. आठ अ, ग्रामपंचायतीचे ठराव व अन्य प्रमाणपत्र मिळण्यातही अडचणी निर्माण झाल्या, तसेच ग्रामपंचायतीच्या मासिक सभाही बारगळल्या होत्या. पुढील गैरसोय टाळण्यासाठी कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी सरपंच मेटांगे यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांच्याकडे वारंवार केली होती. तथापि, या मागणीकडे गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने गावातील विकासात्मक कामे ठप्प पडली आहे.जनतेची कामे मार्गी लागावी तसेच विकासात्मक कामांना चालना मिळावी याकरिता मेडशी ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्यात यावे अन्यथा ताला ठोको आंदोलनाचा इशाराही दिला होता. यावरही गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने 17 आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायतच्या पदाधिका-यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आणि चाबी पंचायत समितीच्या संबंधित कर्मचा-यांकडे सोपविली, अशी माहिती उपसरपंच मूलचंद चव्हाण यांनी दिली. ग्रा. पं. सदस्य समाधान तायडे, शेख जमीर शेख गनिभाई, दत्तराव घुगे, दीपक वानखडे आदिंची उपस्थिती होती. गटविकास अधिका-यांचे ग्रामसेवकांवर नियंत्रण नसल्याने मेडशी येथे ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा प्रसंग ओढवला आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी गावक-यांमधून उमटत होत्या.