शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बोगस अपंग प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळविली; १३ वर्षाने भांडाफोड होताच शिक्षिका गजाआड

By संतोष वानखडे | Updated: February 15, 2023 17:53 IST

यवतमाळ जिल्हयातील रहिवाशी सोनल प्रकाश गावंडे या पांढरकवडा नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.

वाशिम - बोगस आधारकार्डद्वारे वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी दाखवून ऑफलाईन पद्धतीने बोगस अपंग प्रमाणपत्राद्वारे २००९ मध्ये पांढरकवडा नगर परिषद शाळेत नोकरी मिळविणाऱ्या बोगस शिक्षिकेचा मयूर मेश्राम (जि.अमरावती) या उपसरपंचाच्या तक्रारीने भंडाफोड केला. फेरपडताळणीअंती बोगसपणा चव्हाट्यावर आल्याने बुधवारी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये सोनल प्रकाश गावंडे रा. मंगलमुर्ती नगर, वडगाव, यवतमाळ या बोगस शिक्षिकेसह तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यवतमाळ जिल्हयातील रहिवाशी सोनल प्रकाश गावंडे या पांढरकवडा नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. अपंग नसतानादेखील अपंग अनुशेष भरतीमधून २००९ मध्ये नियुक्ती मिळविली असून अपंगत्वाची फेरपडताळणी करावी अशी फिर्यादी मयुर सदानंद मेश्राम (३५) उपसरपंच रा. हिवरा (बु), (ता. नांदगाव खंडे, जि. अमरावती) यांनी शिक्षण विभागाकडे दिली होती. त्या अनुषंगाने फेरपडताळणीचे आदेश दिल्याने सोनल गावंडे यांनी वाशिम जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये २ सप्टेंबर २०२२ रोजी अपंग यु.डी.आय.डी. ऑनलाईन अर्ज दाखल केला. त्या अर्जासोबत ऑफलाईनचे बोगस अपंग प्रमाणपत्र, बोगस आधारकार्डच्या आधारे वाशिम जिल्हयातील रहिवाशी दाखविले आणि त्या आधारे ऑनलाईनचे बोगस यु.डी.आय.डी. प्रमाणपत्र संबंधित विभागाला सादर केले. रूग्णालयामार्फत प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता सर्व कागदपत्र बोगस आढळून आले. यासंदर्भात जिल्हा रूग्णालयाने लेखी पत्राद्वारे वाशिम शहर पोलीस स्टेशनला कळविले. याप्रकरणात नगर परिषदेच्या शिक्षण विभागातील अतुल वानखडे रा. तपानवाडी, यवतमाळ व राजश्री शाहू महाराज प्राथमिक शाळा, पांढरकवडा येथील शिक्षक नहुष ज्ञानेश्वर दरवेशवार रा. सत्यनारायण लेआऊट वडगाव, यवतमाळ हे सुध्दा सहभागी असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावरून तिन्ही आरोपीविरूद्ध भादंवी कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले करीत आहेत.

यवतमाळातील आरोपी, वाशिममधून प्रमाणपत्र अन् अमरावतीतून तक्रार

बोगस अपंग प्रमाणपत्राद्वारे शिक्षिकेची नोकरी मिळविणारी आरोपी यवतमाळ जिल्ह्यातील आहे. बोगस आधारकार्डद्वारे वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी दाखवून आरोपी शिक्षिकेने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातून बोगस प्रमाणपत्र काढले आणि या प्रकरणाची तक्रार अमरावती जिल्ह्यातील हिवरा बु. च्या उपसरपंचांनी केली. या तक्रारीच्या अनुषंगाने फेरपडताळणी केल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. 

टॅग्स :washimवाशिम