मालेगाव (जि. वाशिम) : ग्रामपंचायतची मासिक सभा सुरू असताना, एका इसमाने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याची तक्रार येथील ग्रामविकास अधिकार्यांनी १३ एप्रिलला मालेगाव पोलीस स्टेशनला दिली. यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.१३ रोजी ग्रा.पं.ची मासिक सभा सुरू असताना ग्रामविकास अधिकारी आणि एका इसमामधील वाद थेट पोलीस स्टेशनमध्ये पोचला. ग्रामविकास अधिकारी अशोक श्रीराम साठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा तथा पाणीटंचाईसाठीची चर्चा सुरू असताना आरोपी मनोज नामदेव काळबांडे यांनी सभेमध्ये येऊन माझे मुरुम टाकण्याच्या बिलाचे पैसे का देत नाही, त्या कारणावरून माझ्या अंगावर जाऊन शिवीगाळ करीत मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशोक साठे यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३५३, ३२३, ५0४, ५0६ नुसार मनोज काळबांडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय नांदगावकर, पोहेकाँ मवाळ करत आहे. दरम्यान, ग्रा.पं.च्या सर्व कर्मचार्यांनी काही तास ग्रा.पं.चे काम बंद केले होते; मात्र सरपंच डॉ. विवेक माने व ग्रा.वि.अ. अशोक साठे यांनी मध्यस्थी केल्याने, ग्रामपंचायतच्या कर्मचार्यांनी आपले कामबंद आंदोलन मागे घेतले.
शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल
By admin | Updated: April 14, 2015 01:18 IST