शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी वित्त, विकास महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 16:22 IST

वसूलीचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या काही वर्षांमध्ये लाभार्थींना दिलेली कर्जाची रक्कम व त्यावरील व्याज मिळणे अशक्य झाल्याने थकबाकीचा आकडा चार कोटींपेक्षा अधिक झाला. त्यातुलनेत वसूलीचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे. ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाकडून प्रामुख्याने २० टक्के बीज भांडवल योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत कर्ज आणि राज्य महामंडळांतर्गत १ लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना राबविण्यात येते. इतर मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीयीकृत बँक, ग्रामीण बँक व अग्रणी बँकेने पुरस्कृत केलेल्या बँकांच्या माध्यमातून कर्जाचा पुरवठा केला जातो. त्यानुसार, गेल्या ८ ते १० वर्षात सुमारे ४ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले; मात्र अधिकांश लाभार्थींनी कर्जाच्या मूळ रकमेसह त्यावरील व्याजाचीही परतफेड न केल्याने ओबीसी वित्त आणि विकास महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे. परिणामी, पुर्वी प्रतिवर्षी १०० पेक्षा अधिक केसेसला मंजूरी मिळणाºया या महामंडळांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे प्रमाण अगदीच रोडावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तीन वर्षात केवळ ३८ प्रकरणांना मंजूरीयापूर्वी ज्या लाभार्थींना कर्ज दिले, त्यांच्याकडून मूळ रकमेसह त्यावरील व्याजही मिळणे दुरापास्त झाल्याने ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाने नव्याने कर्ज मंजूर करण्यासाठी विविध स्वरूपातील अटी लादल्या आहेत. त्याची पुर्तता करणे बोगस लाभार्थींना अशक्य असल्याने तीन वर्षांत केवळ ३८ कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत. वाशिमच्या कार्यालयात एकच अधिकारी!ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाची आर्थिक स्थिती खालावल्याचा परिणाम मनुष्यबळावरही झाल्याचे दिसून येत आहे. वाशिम येथील कार्यालयात जिल्हा व्यवस्थापक दर्जाचा एकमेव अधिकारी कायमस्वरूपी सेवेत असून अन्य कर्मचारी कंत्राटी तत्वावर नेमण्यात आलेले आहेत.

टॅग्स :washimवाशिम