शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

ओट्यावर व्यापा-यांचाही शेतमाल !

By admin | Updated: March 9, 2017 02:02 IST

वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये ओट्यावर व्यापा-याच्या मालास जागा मिळत असून, शेतक-यांचा शेतमाल शेडबाहेर ठेवण्यात येतो.

वाशिम, दि. ८- जिल्ह्यातील काही बाजार समितीमधील ओट्यांवर व्यापार्‍यांचाही शेतमाल मोठय़ा प्रमाणावर ठेवला जात असल्याचे बुधवारी 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान दिसून आले. जिल्ह्यात रिसोड, वाशिम, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. याशिवाय उपबाजारही आहेत. यावर्षी तूरीची आवक प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येते. मध्यंतरी बाजार समितीमध्ये हमीभाव मिळत नसल्याने नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी समोर आली. या पृष्ठभूमीवर रिसोड, वाशिम, मंगरूळपीर व कारंजा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाले. नाफेड केंद्रांवर प्रमाणापेक्षा जास्त तुरीची आवक वाढल्याने हा शेतमाल ठेवण्यासाठी गोदाम अपुरे पडले. परिणामी, नाफेडची खरेदी केंद्रे तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली. पर्यायाने आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली आहे. बाजार समितीमधील ओट्यांवर शेतकर्‍यांप्रमाणेच व्यापार्‍यांचाही शेतमाल ठेवला जात आहे. यामुळे विक्रीसाठी आणलेला शेतमाल ओट्याच्या बाजूला खाली ठेवण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेड व ओट्यांची व्यवस्था आहे; मात्र या ओट्यांवर शेतकर्‍यांप्रमाणेच व्यापार्‍यांचा शेतमालही ठेवला जातो. परिणामी, आवक वाढली की शेतकर्‍यांचा शेतमाल ओट्याखाली अर्थात जेथे जागा मिळेल तेथे ठेवला जातो. व्यापार्‍यांसाठी स्वतंत्र गोदामाची व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकर्‍यांकडून शेतमाल खरेदी केल्यानंतर काही दिवस ओट्यांवरच व्यापार्‍यांचा शेतमाल ताडपत्रीने झाकून ठेवला जातो.