शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारात आढळल्या अळ्य़ा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:35 IST

अंगणवाडी केंद्रांतील पोषण आहारांमध्ये अळ्या आढळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. रिसोड तालुक्यातील मांगुळझनक व वडजी येथील पोषण आहारात अळ्या आढळल्याचे दिसून आले. या प्रकाराची दखल घेत आमदार अमित झनक यांनी सोमवारी महिला व बालविकास विभागाला योग्य ती चौकशी करण्याच्या सूचना केल्या.

ठळक मुद्दे आमदार झनकांनी घेतली माहिती नमुने लॅबला पाठविले!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अंगणवाडी केंद्रांतील पोषण आहारांमध्ये अळ्या आढळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. रिसोड तालुक्यातील मांगुळझनक व वडजी येथील पोषण आहारात अळ्या आढळल्याचे दिसून आले. या प्रकाराची दखल घेत आमदार अमित झनक यांनी सोमवारी महिला व बालविकास विभागाला योग्य ती चौकशी करण्याच्या सूचना केल्या.‘टीएचआर’ (टेक होम रेशन) योजनेंतर्गत अंगणवाडीतील बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना पोषण आहार पुरवठय़ाची जबाबदारी काही संस्थांवर सोपविण्यात आली आहे. अंगणवाडीतील तीन ते सहा वर्षे वयोगटातील तीव्र, अतितीव्र, कमी वजनाची बालके, गरोदर व स्तनदा मातांना सुदृढ करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पोषण आहार पुरवठा सुरू केला जातो. उपमा, शिर्‍यासाठी पीठ व सातू पीठ (सुकडी) असलेल्या विशिष्ट वजनाच्या सीलबंद पिशव्या दिल्या जातात. लाभार्थींनी हा आहार घरी नेऊन निश्‍चित केलेल्या पाककृतीप्रमाणे पदार्थात टाकून खायचा आहे. आता या पॉकिटसंदर्भात काही गैरप्रकार आढळत असल्याचे समोर येत आहे. रिसोड तालुक्यातील मांगूळ झनक व वडजी येथे या पॉकिटात अळ्या आढळून आल्याने पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा चव्हाट्यावर येत आहे. या प्रकाराची दखल घेत आमदार अमित झनक यांनी सोमवारी पोषण आहाराच्या पॉकिटची पाहणी केली. यावेळी काही गंभीर बाबी आढळून आल्या. उत्पादन निर्मिती केल्याचा तसेच अंतिम मुदतीचा दिनांक आढळून आला नाही, तसेच अन्य अधिकृत माहितीदेखील पॉकिटवर आढळून आली नाही, अशी माहिती अमित झनक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. झनक यांनी तातडीने महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून पोषण आहाराचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना केल्या. रिसोड पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी ठाकूर यांनी अळ्या आढळलेल्या पाकिटातील पोषण आहाराचे नमुने घेऊन अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे सादर केला. या अहवालावरून सदर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत, असे महिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले.

मांगुळझनक व वडजी येथे पोषण आहाराच्या पाकिटमध्ये अळ्या आढळून आल्या असून, यासंदर्भात योग्य ती चौकशी करण्याच्या सूचना महिला व बालकल्याण विभागाला केल्या आहेत. - अमित झनकआमदार, रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार संघ

टॅग्स :foodअन्न