शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका, डॉक्टरमध्ये वाद; परस्परविरोधात पोलिसांत तक्रार

By admin | Updated: July 15, 2017 01:57 IST

मानोरा : ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कंत्राटी परिचारिकेत वाद झाल्याची घटना १३ जुलैला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. परस्परविरोधी तक्रारीहून मानोरा पोलिसांनी १४ जुलै रोजी घटनेची नोंद केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कंत्राटी परिचारिकेत वाद झाल्याची घटना १३ जुलैला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. परस्परविरोधी तक्रारीहून मानोरा पोलिसांनी १४ जुलै रोजी घटनेची नोंद केली.वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश राठोड यांच्या फिर्यादीनुसार, ग्रामीण रुग्णालयात सेवा देत असताना १३ जुलैच्या रात्री ८ वाजता तेथेच कार्यरत असलेल्या परिचारिका मंदा तुळशिराम घोरसडे (२६) या त्या ठिकाणी आल्या. थकीत असलेल्या वेतनासंदर्भात त्यांनी डॉक्टरशी वाद घातला. त्यानंतर प्रकरण त्या ठिकाणी न थांबता सदर परिचारिकेने डॉक्टरला चप्पलने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले. घटनेचा निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी १४ जुलै रोजी कामकाज बंद ठेवले; मात्र अत्यावश्यक सेवा सुरु होती. दरम्यान, सदर महिला परिचारिकेनेदेखील पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत असे नमूद केले की, निवासस्थानासमोर माझ्या बाळाला घेऊन फिरत असताना, डॉक्टरांनी आवाज दिला. तेव्हा त्यांना मला रिलीव्ह आॅर्डर द्या, असे म्हटले असता, डॉक्टरांनी जातीवाचक शिवीगाळ करीत हात ओढला. त्यामुळे डॉक्टरला चपलाने मारहाण केल्याची फिर्याद दिली. डॉक्टर व परिचारिका यांच्या परस्परविरोधी तक्रारीहून मानोरा पोलिसांनी या घटनेची नोंद केली. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाखोेरे, बिट जमादार सुभाष महाजन, संदीप बरडे आदी करीत आहेत.सदर घडलेला प्रकार हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड होईल, अशी माहिती डॉ.महेश राठोड यांनी दिली.