शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बाधिताची संख्या जास्त असे; मग उपचाराखाली कमी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात २२ सप्टेंबरपर्यंत एकूण ४१७४० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला, त्यापैकी ४१०९९ लोकांनी कोरोनावर मात केली, ...

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात २२ सप्टेंबरपर्यंत एकूण ४१७४० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला, त्यापैकी ४१०९९ लोकांनी कोरोनावर मात केली, तर ६३८ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्थातच २२ सप्टेंबर रोजी केवळ दोन कोरोना बाधित उपचाराखाली असल्याचे स्पष्ट होते. कोरोना बाधितांवरील उपचाराचा आरोग्य विभागाकडून निश्चित कालावधीचा विचार करता पूर्वी बाधिताला २७ दिवस रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर हा कालावधी १७ दिवसांवर आला, तर आता लक्षणे सौम्य असल्यास बाधिताला उपचारासाठी किमान १० दिवस रुग्णालयात ठेवून डिस्चार्ज दिला जातो. तथापि, जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून पाच नवे कोरोनाबाधित आढळले असताना २२ सप्टेंबर रोजीच्या अहवालानुसार केवळ २ व्यक्ती ॲक्टिव्ह अर्थात उपचाराखाली असल्याचे दाखविले जात आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

०००००००००००००००

कुठे झाली गफलत

आरोग्य विभागाकडून दरदिवशी जिल्हाभरातील नवे बाधित आणि कोरोनामुक्त व्यक्तींच्या आकडेवारीची माहिती घेतली जाते. त्यानंतर ही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविली जाते; परंतु गेल्या आठवडाभरापूर्वी संबंधित यंत्रणेकडून माहितीचे संकलन केल्यानंतर ती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडे पाठविताना अचूक पाठविली गेली असावी, असा अंदाज आहे.

०००००००००००००००००

गृहविलगीकरणाच्या माहितीचे संकलन अपूर्ण

अलीकडच्या काळात कोरोना संसर्ग नियंत्रणात असून, नव्या बाधितांतही तीव्र लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना सहसा चार ते पाच दिवस आवश्यकतेनुसार रुग्णालयात ठेवून गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जातो. काही रुग्णांत कोणतीच लक्षणे दिसत नसल्याने त्यांना सुरुवातीपासूनच गृहविलगीकरणात ठेवले जाते. नेमकी हीच माहिती पूर्णपणे संकलित झाली नाही.

०००००००००००००००

कोट: आठवडाभरातील बाधितांच्या तुलनेत ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत कशी तफावत झाली किंवा नेमका काय प्रकार आहे त्याची माहिती संंबंधितांकडून घेऊ आणि दुरुस्ती करण्याच्या सूचनाही देऊ.

- डॉ. अविनाश आहेर,

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

०००००००००००