शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता प्लास्टिकचा वापर करणाऱ्या लाॅन, मंगल कार्यालयांवर कारवाई

By नंदकिशोर नारे | Updated: March 23, 2024 15:47 IST

वाशिम  :  शासन निर्देशानुसार सर्वत्र एकल वापराच्या प्लास्टिकवर , पिशव्यांसह ईतर वस्तुंचा वापर व विक्रीवर बंदी लादण्यात आली आहे. ...

वाशिम  :  शासन निर्देशानुसार सर्वत्र एकल वापराच्या प्लास्टिकवर , पिशव्यांसह ईतर वस्तुंचा वापर व विक्रीवर बंदी लादण्यात आली आहे. तरीही काही जण याचा वापर करणारे दिसून येत असल्याने नियम ताेडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील अनेक व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी निर्णयाचे स्वागत करुन प्लास्टिक विक्री बंद केली, परंतु काही जण अजुनही वापर करीत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून आता लग्न समारंभासह इ्तर कार्यक्रमासाठी लाॅन, मंगल कार्यालयामध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. अपूर्वा बासूर (भाप्रसे) यांनी  घेतला आहे.वाशिम नगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक वापरणाऱ्यांवर धाडसत्र राबवून गत काही दिवसांमध्ये ७ दुकानांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ५५ हजार रुपये दंड व १७० किलाे प्लास्टिक जमा केले आहे. यामुळे अनेक व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

प्लास्टिक अग्निमशमन विभागात जमा करण्याच्या सूचनाशहरातील व्यापाऱ्यांकडे, नागरिकांकडे जर एकल वापराचे प्लास्टिक असेल तर त्यांनी ते वाशिम नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात जमा करण्याच्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत. यानंतर कारवाई दरम्यान एकल वापराचे प्लास्टिक आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

प्लास्टिकमुळे उदभवणारे आजार पाहता नागरिकांनी ते वापरु नये. याबाबत जनजागृती केली जात आहे. जे या नियमांची पायमल्ली करणार त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्या जाणार आहे. या उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे.डाॅ. अपूर्वा बासूर, (भाप्रसे) मुख्याधिकारी, नगर परिषद वाशिम