शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित तीन शाळा व मुख्याध्याकांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:13 IST

तीन अनुदानित शाळा व संबंधित मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्याच्या सूचना संबंधित गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी दिली.

ठळक मुद्देशाळा व त्यांच्या मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे शिक्षण संचालकांचे (प्राथमिक) आदेश. वाशिम जिल्ह्यात एकूण १२ शाळा आढळल्या होत्या. दोन शाळा जिल्हा परिषदेच्या असल्याने उर्वरीत १० शाळांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यभरामध्ये ३ ते ५ आॅक्टोबर २०११ दरम्यान प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेदरम्यान वाशिम जिल्ह्यातील एकूण १२ शाळांध्ये कमी उपस्थिती आढळून आली होती.  तसेच काही शाळांमध्ये बोगस विद्यार्थी पटावर दाखविल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी शाळा व त्यांच्या मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे शिक्षण संचालकांचे (प्राथमिक) आदेश प्राप्त होताच, प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी कार्यवाहीला सुरूवात केली. पहिल्या टप्प्यात योग्य ती चौकशी करून तीन अनुदानित शाळा व संबंधित मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्याच्या सूचना संबंधित गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी दिली.राज्यामध्ये विशेष पटपडताळणी मोहिमेदरम्यान ज्या शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत ५0 टक्केपेक्षा कमी उपस्थिती आढळून आली होती तसेच अनेक शाळांमध्ये पदे वाचविण्याच्या दृष्टिकोनातून बोगस विद्यार्थी पटावर दाखवून वाढीव तुकडी मागणे, वाढीव तुकड्या दाखवून अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर करून घेण्यात आली होती.  तसेच या शाळांनी शासनाच्या शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्तीचा सुद्धा लाभ घेतला. पटपडताळणी मोहिमेत २० टक्केपेक्षा जास्त अनुपस्थिती असलेल्या शाळांची मान्यता रद्द का करू नये, अशा नोटीस शाळांना बजावण्यात आल्या होत्या. ५० टक्केपेक्षा जास्त अनुपस्थिती असलेल्या शिक्षण संस्था व मुख्याध्यापकाविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून शाळेची मान्यता काढून घेण्याचा आदेश शासनाने २ मे २0१२ रोजी दिला होता. परंतु राज्यातील काही शिक्षण संस्थाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. परंतु, प्राथमिक शिक्षण संचालकांनी न्यायालयात शपथपत्र सादर केले. उच्च न्यायालयाने संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचाºयांविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्याचे शासनाचे अधिकार आहेत. परंतु, केवळ ५० टक्केपेक्षा विद्यार्थी उपस्थिती कमी आहे, या कारणावरून गुन्हा दाखल करू नये, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने शाळांबाबत काही बाबी निदर्शनास आल्याने, आदेशाची पूर्तता करण्यास बजावले. त्यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक करून, खोटी कागदपत्रे बनवून ती खरी असल्याचे भासविल्याने या शाळा, मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी दिला आहे. फौजदारी कारवाई करून त्याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयास सादर करावयाचा असल्याने, तो शिक्षण संचालनालयास सादर करावा, असेही स्पष्ट केले आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण १२ शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी दोन शाळा जिल्हा परिषदेच्या असल्याने उर्वरीत १० शाळांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले. या १० शाळांपैकी तीन शाळा अनुदानित असल्याने पहिल्या टप्प्यात या तीन शाळांप्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्यात यावी, अशा सूचना गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या. त्यानंतर विनाअनुदानित ७ शाळा, मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे मानकर यांनी सांगितले.