शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांपासून तळप, रामतिर्थ गावाचा पाणी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:50 IST

मानोरा  : महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरठा योजनेमध्ये ग्रामपचांयत अंतर्गत तळप बु. , रामतिर्थ या गावाचा समावेश आहे, परंतु गेल्या आठ दिवसापासुन येथील पाणी पुरवठा बंद आहे.

ठळक मुद्देलाखो रुपये  खर्च करुन मजीप्राची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली.रोहीत्र जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद असल्याचे सांगण्यात येते, परंतु आठ दिवस उलटुनही  पाणी पुरवठा सुरु झाला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरठा योजनेमध्ये ग्रामपचांयत अंतर्गत तळप बु. , रामतिर्थ या गावाचा समावेश आहे, परंतु गेल्या आठ दिवसापासुन येथील पाणी पुरवठा बंद आहे.धरणावरील विद्युत रोहीत्र जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद असल्याचे समजते, परंतु आठ दिवस उलटुनही संंबंधीत विभागाकडुन पाणी पुरवठा पुर्ववत करण्याबाबत कारवाई केल्या जात नाही. त्यामुळे सदरहुन योजना रामभरोसे असल्याचे दिसुन येते. तालुक्यातील २८ गावातील पाणी समस्या निकाली काढण्याच्या उद्देशाने लाखो रुपये  खर्च करुन मजीप्राची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली. यामध्ये तळप बु व रामतिर्थ या गावाचा  समावेश आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे येथील पाणी पुरवठा नेहमीच बंद राहतो. याबाबत तात्काळ कारवाई केल्या जात नाही. पाणी पुरवठा करणाºया धरणावरील विद्युत रोहीत्र जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद असल्याचे सांगण्यात येते, परंतु आठ दिवस उलटुनही  पाणी पुरवठा सुरु झाला नाही.  गंगाधर ढोेरे, सारखे कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे ही योजना अगदीच रामभरोसे  झाली आहे.कारंजा विभागातील अधिकारी कर्मचारीकरिता या योजनेचे देणे घेणे नसल्यासारखे वागत आहे. वरिष्ठांनी याबाबत लक्ष देण्याची मागणी होत आहे.सदरहु योजनेचा गावात पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. पाणी पुरवठा तात्काळ सुरु करण्यात यावा. - इंदुताई पाटील, सरपंच ग्रा.पं.तळप.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा