शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ना लसीकरण, ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग; तिसरी लाट कशी रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 10:58 IST

Washim News : ग्रामीण भागात संभाव्य तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व लसीकरणाची गती मंदावली असल्याने आणि वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याने ग्रामीण भागात संभाव्य तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी आढळून आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च, एप्रिल महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. एप्रिल महिन्यापासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. चाचण्यांच्या तुलनेत रुग्णसंख्या स्थिर असल्याचे दिसून येते. मात्र, त्याचबरोबर ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याचेही समोर येत आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान १५ जणांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश आहेत. त्या तुलनेत कमी प्रमाणात चाचण्या होत असल्याचे दिसून येते. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. तथापि, गत एका महिन्यापासून मागणीच्या तुलनेत पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीमही प्रभावित होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तालुकास्तरीय कोविड केअर सेंटरमध्येदेखील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध नाही. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व लसीकरणाला गती देणेही आवश्यक ठरत आहे.  

उपलब्ध लसीनुसार ग्रामीण व शहरी भागात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना चाचण्यांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिलेल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत आहे. नागरिकांनीदेखील सहकार्य करून योग्य ती दक्षता घ्यावी.-  डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस