शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

ना स्वतंत्र शौचालय, ना स्वच्छतागृह; तरीही गृहविलगीकरणाला परवानगी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:41 IST

संतोष वानखडे वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ९ मे पासून कडक निर्बंध लागू आहेत, जिल्हा प्रशासनातर्फे ...

संतोष वानखडे

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ९ मे पासून कडक निर्बंध लागू आहेत, जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे; तर दुसरीकडे ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नसतानाही गृहविलगीकरणाला परवानगी देण्यात येत आहे. यामुळे कोरोनाबाधितापासून कुटुंबातील इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मे महिन्यात आतापर्यंत शहरी भागात ५८०७ तर ग्रामीण भागात ७४७६ रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागातील रुग्णाच्या घरी स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची व्यवस्था नसतानादेखील गृहविलगीकरणाला परवानगी दिली जात आहे. यामुळे घरातील एकाच स्वच्छतागृह, शौचालयाचा वापर हा रुग्ण व कुटुंबातील इतर सदस्यांकडून केला जातो. परिणामी, कुटुंबातील अन्य सदस्यांनादेखील संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. गोवर्धन, शिरपूर, अनसिंग, धमधमी, शेलुबाजार, खैरखेडा या गावात एकाच कुटुंबातील अधिकाधिक सदस्यांना संसर्ग झाला आहे. कोविड केअर सेंटरमध्ये मुबलक प्रमाणात बेड उपलब्ध असतानाही गृहविलगीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात सध्या ३७५६ रुग्ण सक्रिय आहेत. यापैकी केवळ ४७२ रुग्ण खासगी कोविड तसेच सरकारी कोविड केअर सेंटर, रुग्णालयात भरती आहेत तर उर्वरीत तब्बल ३२८४ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नसल्यास गृहविलगीकरणाला परवानगी देऊ नये, असा सूर वैद्यकीय क्षेत्रासह ग्रामीण भागातील सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.

0000000000

एकूण सक्रिय रुग्ण - ३७५६

गृहविलगीकरणातील रुग्ण - ३२८४

रुग्णालयात दाखल रूग्ण - ४७२

000000

खाटाचा प्रकार भरती रुग्णरिक्त बेड

सर्वसाधारण १९० ८७२

आॅक्सिजन २५३ २२१

आयसीयू २९ ४४

००००००

बॉक्स..

.. तर यापुढे गृहविलगीकरण पूर्णत: बंद !

१) जिल्ह्यात ग्रामीण भगाात रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. यापुढे संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात येणार असून, असा आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २२ मे रोजी काढला. काही निवडक परिस्थिती वगळता यापुढेही गृहविलगीकरण पूर्णत: बंद करण्यात यावे. यासाठी प्रत्येक गावात संस्थात्मक विलगीकरणासाठी इमारती शोधण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.

२) संबंधित इमारतीमध्ये पिण्याचे व वापरण्याचे पाणी,. पंखा, विद्युत दिव्याची व्यवस्था, शौचालय यापैकी काही व्यवस्था नसल्यास ग्रामपंचायतीकडील १५ व्या वित्त आयोगातून दुरुस्तीची कामे घेऊन प्रत्येक गावात अशा इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी सज्ज ठेवाव्यात. अशा संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णास त्यांचे घरुन जेवणाचा डब्बा व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याची मुभा देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या.

यापूढे गावात कोरोना रुग्ण आढळून आल्यास, लक्षणे नसलेले रुग्ण या इमारतीमध्ये संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात येतील. जे रुग्ण या संस्थात्मक विलगीकरणाच्या अटी व शतीर्चे पालन करणार नाहीत अशा सर्व रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणावरील कोविड केअर सेंटर येथे तातडीने हलविण्यात यावे. आवश्यकता पडल्यास गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या.