शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरात बालकांसाठीचे ऑक्सिजन मास्क मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 11:59 IST

pediatric oxygen mask : सर्वच औषधी दुकाने शाेधूनही मिळत नसल्याने पालकांची चांगलीच धावपळ हाेत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : काेराेनासह इतर आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना लागणारे ऑक्सिजन मास्क शहरातील सर्वच औषधी दुकाने शाेधूनही मिळत नसल्याने पालकांची चांगलीच धावपळ हाेत असल्याचे दिसून येत आहे.एकीकडे काेराेना संसर्गाची तिसरी लाट लहान मुलांसाठी असल्याचा अंदाज आराेग्य विभागातर्फे वर्तविला जात आहे. याकरिता शहरातील बालराेग तज्ज्ञ सरसावले असून, ॲक्शन प्लॅनसुद्धा तयार करण्यात येत आहे. शहरातील बालराेग तज्ज्ञांचा हा स्तुत्य उपक्रम असल्याची चर्चा हाेत आहे. परंतु, खासगी दवाखान्यामध्ये दाखल असलेल्या व ऑक्सिजनची गरज असलेल्या बालकांसाठी असलेले ऑक्सिजन मास्क (पिड्रॅटिक्स मास्क) हे शहरात कुठेच उपलब्ध नसल्याने नाइलाजास्तव डाॅक्टर सर्वांना लागत असलेले ऑक्सिजन मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. या मास्कमधून पाहिजे त्या प्रमाणात बालकांना ऑक्सिजन पुरवठा हाेताना दिसून येत नाही.

इतर मास्कच्या तुलनेत पिड्रॅटिक्स मास्क महागडेसर्वसामान्य रुग्णांना लागणाऱ्या मास्कच्या तुलनेत पिड्रॅटिक्स माक्स महागडे असल्याने डाॅक्टर मंडळी या मास्कला पसंती देत नसल्याचे औषधी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे हे मास्क ऑर्डर केले जात नसल्याचे एका औषधी विक्रेत्यांनी सांगितले. ऑक्सिजन मास्क १०० रुपयांपर्यंत मिळत असून, लहान बालकांना लागणारे मास्क मात्र ४५० रुपयांपर्यंत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

रुग्णांचे नातेवाईक  घेऊन येत असलेले प्रिस्क्रिप्शनवर ऑक्सिजन मास्क असे लिहून दिले जाते. विशेष लहान मुलांकरिताचे ऑक्सिजन मास्क काेणी मागत नसल्याने ठेवण्यात येत नाही. मागणी नसल्याने शहरातील बहुतांश औषधी विक्रेते हे मास्क ठेवत नाहीत.- हुकूम तुर्के औषधी विक्रेता, वाशिम

काेराेना संसर्ग राेखण्यासाठी आराेग्य विभाग प्रयत्नशील आहे. तिसरी लाट लहान मुलांवर असल्याचे संकेत आहेत. त्यानुसार नियाेजन केले जात आहे. लहान मुलांना लागणाऱ्या ऑक्सिजन मास्कसह इतरही उपाय याेजना केल्या जातीत.- डाॅ. मधुकर राठाेडजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम