शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेप्रवास नको रे बाबा; वाशिम रेल्वेस्थानकात सर्वत्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:53 IST

Washim railway station : ५० ते ६० प्रवाशी वाशिम स्थानकावरून रेल्वेत बसत असून, आगामी आरक्षित तिकिटही रद्द केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशात सर्वत्रच कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रवाशीदेखील खबरदारी घेत असल्याचे वाशिम रेल्वे स्थानकावर दिसून आले. दैनंदिन केवळ ५० ते ६० प्रवाशी वाशिम स्थानकावरून रेल्वेत बसत असून, आगामी आरक्षित तिकिटही रद्द केले जात आहे.देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२० या दरम्यान वाशिम येथून धावणाºया रेल्वेही बंद होत्या. आॅक्टोबर महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विशेष रेल्वे गाड्या वाशिममार्गे सुरू झाल्या. सध्या एकूण १५ रेल्वेगाड्या वाशिममार्गे धावत असून, यामध्ये पॅसेंजर गाड्यांचा समावेश नाही. दरम्यान, फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने प्रवाशांनी नियोजित प्रवास लांबणीवर टाकल्याचे दिसून येते. आरक्षण रद्द करण्याकडे अनेकांचा कल असून, वाशिम येथील स्थानकावरून दैनंदिन सरासरी ५० ते ६० प्रवाशी रेल्वेत बसत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रासह अन्य राज्यातही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रवाशीदेखील खबरदारीचा प्रयत्न म्हणून घरातच राहण्याला पसंती देत आहेत.  इंटरसिटी एक्सप्रेसलाही गर्दी कमीचअकोला-काचीगुडा इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये एरव्ही सर्वाधिक गर्दी असते. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतरदेखील या रेल्वेत फारशी प्रवाशी संख्या नव्हती. मध्यंतरी प्रवाशी मिळत नसल्याने इंटरसिटी एक्सप्रेस काही दिवस बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाच्या दुसºया लाटेतही इंटरसिटी एक्सप्रेस सुरू असली तरी प्रवाशांची गर्दी नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गापासून स्वत:चा बचाव म्हणून अनेकजण प्रवास टाळत आहेत. अत्यावश्यक काम असेल तरच प्रवास करण्याला प्राधान्य दिले जाते.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्यादेखील कमी झाली आहे. रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात येते. परंतू, पूर्वीच्या तुलनेत आता प्रवाशी संख्या कमी झाल्याने रेल्वे स्थानक येथे गर्दी दिसून येत नाही.एम.टी. उजवेरेल्वेस्थानक प्रमुख, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमWashim railway stationवाशिम रेल्वे स्टेशन