शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

वाशिममध्ये ‘नो पार्किंग झोन’ फलकावरच!

By admin | Updated: May 19, 2014 01:13 IST

पार्किंग झोनच्या परिसरात खासगी वाहने आढळून आली तर कारवाई करण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या स्पष्ट सूचना असतानाही येथे खुलेआम वाहने उभी केली जात असल्याचे चित्र आहे.

ह्यनो पार्किंग झोनह्ण फलकावरच! वाशिम : ह्यनो पार्किंग झोनह्णबाबतचे वाशिम जिल्हाधिकार्‍यांचे आदेश पायदळी चिरडत खासगी वाहनधारकांनी बसस्थानकाच्या २00 मीटर परिसरातच ह्यवाहनतळह्ण निर्माण केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशांची अंमलबजावणी करणार्‍या वाहतूक शाखेनेही खासगी वाहनधारकांसमोर सपशेल नांगी टाकली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याबरोबरच एसटी महामंडळाचे उत्पन्न कमी होणार नाही, या दृष्टिकोनातून बसस्थानकापासून २00 मीटरच्या परिसरात ह्यनो पार्किंग झोनह्णची सीमारेषा आखून देण्यात येते. या सीमारेषेतून खासगी प्रवासी वाहनांना प्रवाशांची ने-आण करता येणार नाही तसेच खासगी वाहनांनी तळ ठोकू नये, असे बंधन टाकण्यात आलेले आहे. वाशिम शहरातील बसस्थानक परिसर जिल्हाधिकार्‍यांनी ह्यनो पार्किंग झोनह्ण म्हणून घोषित केला आहे. येथे खासगी वाहनांना थारा देऊ नका, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकार्‍यांचे आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या खांद्यावर सोपविण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीत जिल्हाधिकार्‍यांच्या नो पार्किंग झोनबाबतच्या निर्देशांना पायदळी तुडविण्यापर्यंत खासगी वाहनधारकांनी मजल मारली असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. नो पार्किंग झोनच्या परिसरात खासगी वाहने आढळून आली तर कारवाई करण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या स्पष्ट सूचना असतानाही येथे खुलेआम वाहने उभी केली जात असल्याचे चित्र आहे. मोटारसायकलवर मोठय़ा प्रमाणात कारवाई करीत असल्याचा गवगवा करणारी शहर वाहतूक शाखा खासगी प्रवासी वाहनधारकांसमोर नांगी का टाकते, हा संशोधनाचा विषय बनत आहे. शहर वाहतूक शाखेबरोबरच उपप्रादेशिक परिवहन विभागानेदेखील नो पार्किंग झोनची अंमलबजावणी करण्याच्या आदेशाला सोयिस्कररित्या केराची टोपली दाखविण्यातच धन्यता मानली असल्याचे एकंदरित परिस्थितीवरून दिसून येते. ह्यनो पार्किंग झोनह्णचा फलक असलेल्या ठिकाणासमोरच खासगी वाहनतळ बनल्याने यामागे अर्थकारण तर दडले नाही ना, अशी शंकाही वर्तविली जात आहे. वाशिम शहरात खासगी वाहनांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नाही, या एकमेव सबबीखाली नो पार्किंग झोनच्या अंमलबजावणीवर पडदा टाकला जात आहे.