शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील बसगाड्यांना हिंगोली, परभणीत ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:36 IST

विदर्भातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत आहे. याचा परिणाम हिंगोली व परभणी जिल्ह्यात होऊ नये म्हणून तेथील ...

विदर्भातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत आहे. याचा परिणाम हिंगोली व परभणी जिल्ह्यात होऊ नये म्हणून तेथील जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकांनी विदर्भातील एसटी बसगाड्यांना प्रवेश बंदी केली आहे.

अकोला आगाराची अकोला - परभणी ही बसफेरी गतकाही दिवसापासून रिसोडपर्यंत जात आहे. यामुळे सेनगाव, जिंतूर, येलदरी, परभणीकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पुढे बस जात नसल्याने पानकनेरगाव, सेनगाव, येलदरी, जिंतूर, परभणी जाणाऱ्या प्रवाशांना रिसोडपर्यंत प्रवास करावा लागत आहे. तेथून त्यांना हिंगोली ,जिंतूर किंवा परभणी आगाराच्या बसने पुढील प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अनावश्यक चढ-उतार करावा लागत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अकोला परभणी बस चालक ,वाहक यांच्याशी विचारणा केली असता परभणी आगारातून विदर्भातील अकोला विभागाची बस परभणी येथे आणू नये असे सांगण्यात आले. मात्र दुसरीकडे रिसोड आगारात परभणी ,जिंतूर, हिंगोली, नांदेड आगाराच्या बसेस नियमित येत आहेत. विशेष म्हणजे परभणी विभागाची जिंतूर आगाराची जिंतूर - अकोला ही बसफेरी अकोलापर्यंत ये जा करीत आहे.

———————

दोन दिवसापूर्वी माझ्या कुटुंबातील लोकांना परभणी येथे जायचे होते. मात्र अकोला -परभणी बस रिसोडपर्यंत जाणार आहे असे वाहकाने म्हटल्याने खासगी वाहन घेऊन परभणी येथे जावे लागले.

- मुक्तारखा पठाण

शिरपूर जैन.

————————

१५ मार्चपर्यंत परभणी जिल्हा प्रशासनाने व नगरपालिका प्रशासनाने विदर्भातील बसेसला परभणी हिंगोली जिल्ह्यात बंदी केली आहे. त्या कारणास्तव विदर्भातील बसेस हिंगोली व परभणी येथे पाठविणे बंद आहे.

- स्मिता सुतावणे ,

विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन विभाग अकोला.