शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पार्डी ताड ग्रामपंचायतच्या चौकशीनंतर कारवाई गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:08 IST

पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी २५ सप्टेंबर रोजी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली; परंतु या प्रकरणी पुढील कारवाई मात्र गुलदस्त्यातच आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड (वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे नियमित ग्रामसभा होत नसल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतकडून गटविकास अधिकाºयांकडे करण्यात येत होत्या. या संदर्भात लोकमतने ६ सप्टेंबर रोजी पार्डी ताड येथे वर्षभरापासून ग्रामसभाच नाही. या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी २५ सप्टेंबर रोजी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली; परंतु या प्रकरणी पुढील कारवाई मात्र गुलदस्त्यातच आहे. पार्डी येथील ग्रामपंचायतच्या सचिवांनी आॅगस्ट २०१७ मध्ये प्रभार घेतल्यापासून ग्रामसभेचे आयोजन केले नाही, तसेच ते गावात नियमित येत नाहीत. मासिकसभेलाही उपस्थित राहत नाहीत. ग्रामपंचायत अधिनियमानुसार एका वर्षात २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे आणि गांधी जयंतीला ग्रामसभेचे आयोजन आवश्यक असताना वर्षभरात एकही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळेच गावात तंटामूक्ती अध्यक्षाची निवड होऊ शकली नाही, अशा प्रकारची तक्रार ग्रामस्थांच्यावतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडे करण्यात आली होती. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून पंचायत समितीचे लक्ष वेधल्यानंतर गटविकास अधिकाºयांनी विस्तार अधिकारी पद्मने यांच्यामार्फत २५ सप्टेंबर रोजी या प्रकाराची चौकशी केली. यावेळी विस्तार अधिकाºयांनी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसचिव, तसेच पांडुरंग लांभाडे, मारोती जटाळे आणि मंगेश लांभाडे, प्रकाश डाळ, बाळू लांभाडे, गणेश जटाळे, दिनकर डाळ, परशराम लांभाडे या ग्रामस्थांचे बयाण नोंदविले. या चौकशीला २ महिने उलटले तरी, कुठलीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पंचायत समितीने चौकशीचा केवळ दिखावाच केला काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बयाणात आढळला होता विरोधाभास पार्डी ताड येथील ग्रामसभेबाबत केलेल्या चौकशीदरम्यान ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवांसह ग्रामस्थांच्या बयाणात विस्तार अधिकाºयांना विरोधाभासही आढळून आला होता. सचिवांनी १५ आॅगस्ट रोजी त्यांच्याकडे चांभईचा प्रभार असल्याने पार्डी ताड येथे सभा घेतली नसल्याचे; परंतु २३ आॅगस्ट रोजी १२२ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभा घेतल्याचे नमूद केले, तर सरपंचांनीही २३ आॅगस्ट रोजी १२२ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभा झाल्याचे नमूद केले; परंतु पांडुरंग लांभाडे, मारोती जटाळे आणि मंगेश लांभाडे या तिन्ही ग्रामस्थांनी २३ आॅगस्ट रोजी ग्रामसभा झालीच नसल्याचे बयाणात सांगतानाच हजेरी पुस्तकातील स्वाक्षरी आपली नसल्याचेही दोघांनी म्हटले होते.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत