मंगरुळपीर (वाशिम) : राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने शेतकर्यांना देशोधडीस लावले, असा घणाघाती आरोप मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज येथे आयोजित सभेत के ला.वाशिम जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेला संबोधित करताना शिवराजसिंह चौहान म्हणाले की, मध्यप्रदेशात भाजप सरकारने शेतकर्यांना सिंचनासाठी सुविधा उ पलब्ध करून दिल्या. केवळ चार हजार क ोटी रुपये खचरून २0 हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणली. याउलट महाराष्ट्रात आघाडी सरकारने २७ हजार कोटी रुपये सिंचनावर खर्च केले; त्यांना १0 हजार हेक्टर क्षेत्रही सिंचनाखाली आणता आले नाही. मध्य प्रदेशातील रस्त्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट असल्याचे त्यांनी सांगितले.
आघाडी सरकारने शेतक-यांना देशोधडीस लावले
By admin | Updated: October 13, 2014 02:05 IST