शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"नमो" खुलवणार वाशिम शहराचा चेहरा !

By दिनेश पठाडे | Updated: October 28, 2023 15:22 IST

या अंतर्गत राज्यातील २५ महानगरपालिका व ४८ नगर परिषद-नगर पंचायतींची निवड करण्यात आली आहे.

वाशिम : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील ७३ शहरांमध्ये ''नमो शहर सौंदर्यीकरण अभियान'' राबविण्याचा निर्णय नुकताच नगर विकास विभागाने घेतला आहे. यात वाशिम नगर परिषदेचा समावेश करण्यात आला आहे. सौंदर्यीकरण, स्वच्छता आदी उपक्रम यशस्वीपणे राबविल्यास शहराचा चेहरा खुलणार आहे. त्या अनुषंगाने स्थानिक नगर परिषद प्रशासनाने नियोजन सुरु केले आहे.

नागरी भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना सुख-सोयी मिळण्यासाठी, त्याचप्रमाणे शहरांचे सौंदर्य टिकून राहावे या हेतूने लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक असल्याच्या पार्श्वभूमीवर शहर सौंदर्यीकरण अभियान राबविले जाणार आहे. या अंतर्गत राज्यातील २५ महानगरपालिका व ४८ नगर परिषद-नगर पंचायतींची निवड करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात केवळ वाशिम नगर परिषदेचा यात समावेश झाला आहे. अभियानासाठी लोकाभिमुख, समाजसुधारक, प्रसिद्ध व्यक्ती यांची स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

शहरातील जीवनमान उंचावण्यासाठी बगीचे, तलाव, रस्ते, पदपथ, दुभाजक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण टिकून रहावे यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.   निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश शासनाच्या उपसचिव सुशीला पवार यांनी दिले आहेत. तथापि, यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध न करता स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या स्व-निधीतूनच खर्च करावा लागणार असल्याने निधीची अडचण निर्माण होण्याची चिन्हे आहेत.