शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अंजनखेड्याच्या खून प्रकरणाचे नागपूर ‘कनेक्शन’

By admin | Updated: June 6, 2017 01:12 IST

पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश : खून प्रकरणातील वाहन ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अंजनखेडा (ता.जि. वाशिम) येथील माजी उपसरपंच तथा कंत्राटदार बबन भागवत पायघन (वय ५०) यांची अज्ञात इसमांनी हत्या केल्याची घटना २६ मे रोजी घडली होती. या हत्याकांडामध्ये नागपूर येथील आरोपींचा समावेश असून, एका पोलीस कर्मचाऱ्यासह वाहनचालकाला ५ जून रोजी ताब्यात घेतले. अंजनखेडा येथील माजी उपसरपंच बबन पायघन हे रस्ता बांधकाम सुरू असलेल्या कामाकडे घोडबाभूळ शिवारात गेले होते. सुरू असलेल्या कामाची पाहणी करायला जात असताना अज्ञात इसमांनी त्यांची तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली व त्यांच्या बोटामधील सोन्याच्या अंगठ्या व सोनसाखळी असा २ लाखाचा ऐवजही लंपास केला होता. यावेळी मारेकऱ्यांनी वापरलेल्या चार चाकी वाहनाने एका इलेक्ट्रीक पोलला धडक दिल्यामुळे वाहनाचे लाईट व काचा घटनास्थळावर आढळून आल्या. या चार चाकी वाहनाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक वाठोरे व पोलीस शिपाई राजेश बायस्कर यांना नागपूरच्या दिशेने पाठविले. नागपूरकडे जात असताना या दोघांनीही किमान २२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारावर नागपूर येथून एम.एच. ३१ सी.एम. ७२६५ क्रमांकाचे (ईनोवा) वाहन ताब्यात घेतले. या वाहनाची तपासणी केली असता मारेकऱ्यांनी वाहनाचे तुटलेले भाग बदलवून वाहन पुन्हा ‘जैसे थे’ स्थितीमध्ये ठेवले. या वाहनाची नागपूर (वाडी) येथील एका गॅरेजवर दुरूस्ती केली होती. त्या ठिकाणाहून पोलिसांनी वाहनाचे मूळ स्थितीमध्ये असलेले स्पेअर पार्टस् व वाहन पोलिसांनी जप्त केले. याशिवाय एका पोलीस कर्मचाऱ्यासह वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती हाती आली आहे. वृत्त लिहेपर्यंत अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, ठाणेदार सुनील अंबूलकर व त्यांचे पथक अत्यंत गोपनीय पद्धतीने आरोपिंची कसून चौकशी करीत आहेत. खून प्रकरणातील आरोपींची नावे रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी अधिकृतरीत्या जाहीर केली नाहीत.वैमनस्यातून झाले हत्याकांड बबन पायघन यांची हत्या वैमनस्यातून झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पायघन यांची हत्या करण्यासाठी मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला व नागपूर येथील पोलीस दलात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.