वाशिम : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर (दि.२८) मालेगाव व मानोरा नगर पंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, एकूण १९९ उमेदवार निवडणुकीत रिंगणात आहेत. मालेगाव येथे ३८ उमेदवारांनी माघार घेतल्याने ९२ उमेदवार रिंगणात असून, मानोरा येथे १५ जणांनी माघार घेतल्याने १0७ उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. येत्या १0 जानेवारी २0१६ रोजी होऊ घातलेल्या १७ जागेकरिता मानोरा नगर पंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २८ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेला १५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने १७ जागेकरिता एकूण १0७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. प्रथमच होणार्या मानोरा नगर पंचायत निवडणुकीबाबत शहरातील जनतेसह मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत गोविंद श्यामराव भोरकडे, विशाल विजय भगत, कल्पना अरुण लवटे, उषा शेरसिंग जाधव, सुशिला तुळशिराम जाधव, संगीता संजीव जाधव, मोहम्मद असलम जिकर पोपटे, विष्णू तुकाराम ढोके, आरती अमोल रोठे, अनिल लक्ष्मण कंठाळे, मेरुनिसा अजगर खान, सविता राजू आमटे, शेख इरफान शेख अख्तर, शेख हुसेन शेख रसुल, प्रशांत विजय भगत, गजानन वसंता ढोके, शेख हुसैन शेख रसुल असे एकूण १५ उमेदवारांनी माघार घेऊन अर्ज मागे घेतले. आतापर्यंंत एकूण १२५ उमेदवारांपैकी १८ उमेदवाराने आपले नामांकन अर्ज परत घेतल्याने १७ जागेकरिता १0७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेला उमेदवारांनी निवडणुकीमधून अर्ज मागे घेतल्याने मानोरा नगरपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मानोरा येथील नगर पंचायत निवडणुकीत खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, माजी आमदार प्रकाश डहाके, भारिप-बमसंचे नेते युसूफ पुंजाणी, माजी जिल्हा परिषद सभापती हेमेंद्र ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव यांच्यासह अन्य स्थानिक नेते या निवडणुकीवर लक्ष ठेवून असल्याने थंडीच्या गारठय़ातही राजकीय वातावरण तापले असल्याचे दिसून येते.
नगर पंचायत निवडणूक रिंगणात १९९ उमेदवार
By admin | Updated: December 29, 2015 02:09 IST