लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : मालेगाव तालुक्यात हमीभावाने नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरु न झाल्याने शेतक-यांना कमी दराने सोयाबीन विकावी लागत असुन नाफेड खरेदी केंद्र सुरु करण्यात नाफेडसह मालेगाव बाजार समिती, खरेदी विक्री संस्था टाळाटाळ करीत असल्या संदर्भात वृत्त लोकमतच्यावतिने १५ नोव्हेबर रोजीचय अंकात प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नाफेड सोयाबीन खरेदी केंद्र काटयाचे भूमिपूजन करण्यात आले. उद्या १६ नोव्हेंबरपासून रितसर खरेदी सुरु केल्या जाणार असल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मालेगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १५ नोव्हेंबर रोजी नाफेड खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शुभारंभाचे दोन कार्यक्रम पार पडले. सकाळी ११ वाजता बाजार समिती संचालक गोपाल पाटिल राऊत यांच्या हस्ते काट्याचे पूजन करून खरेदीचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी खरेदी विक्री व प्रक्रिया संस्था अध्यक्ष भगवान शिंदे .,उपाध्यक्ष सुभाष देवळे ,बाजार समितीचे संचालक प्रमोद नवघरे , प्रकाश शिंदे , खविस चे व्यवस्थापक अरुण इंगोले , कर्मचारी माधव काळपांडे आदि उपस्थित होते . त्यानंतर दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलिपराव जाधव , बाजार समितीचे संचालक गणेश उंडाल ,आनंदा बोरचाटे ,चंदु रेघिवाले , कैलास आंधळे ,कैलास पाठक ,कॉँग्रेस चे तालुका अध्यक्ष जगदीश बळी , खविस चे अध्यक्ष भगवान शिंदे , डॉ नारायणराव शेंडगे आदि उपस्थित होते .- तब्बल दिड महिन्यांपासून शेतकºयांचे सोयाबीन खरेदीसाठी प्रतिक्षा करत असतांना कोणीही पुढाकर न घेता खरेदी केंद्र सुरु करण्याच्या सूचना नाफेडच्या डिएमओ यांनी दिल्यानंतर बाजार समितीतील दोन नेत्यांनी याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे बोलल्या जात होते.- शेतकºयांची सोयाबीन खरेदी सुरु झाल्यानंतर एकाचवेळी शुभारंभाला सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम घ्यायचे अपेक्षित असतांना आपल्यामुळे यश आल्याचे यावेळी भासविण्यात आले.
मालेगाव तालुक्यात नाफेड सोयाबीन खरेदीचा ’श्रीगणेशा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 8:44 PM
मालेगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १५ नोव्हेंबर रोजी नाफेड खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शुभारंभाचे दोन कार्यक्रम पार पडले.
ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल नेत्यांचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न