लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : रिसोड येथे नाफेडची तूर खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. नाफेडची खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी रिसोड तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसिलदारांना निवेदन सादर केले.शेकडो शेतकरी नाफेडच्या तूर खरेदीच्या प्रतिक्षेत आहेत. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड अंतर्गत तुर खरेदी सुरू करावी, अशी मागणी नारायणराव सानप, दिगांबर जाधव, विलास गिरी, नारायण साबळे, ज्ञानबा आरु, अनिल बेलोकर, भागवत इंगोले, केशव बाजड यांच्यासह शेतकऱ्यांनी सोमवारी केली.
रिसोड येथे नाफेडची खरेदी बंद
By admin | Updated: May 16, 2017 01:41 IST