शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदीतील आर्द्रतेची अट शिथिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 19:40 IST

शासनाच्यावतीने नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या  सोयाबीन खरेदीसाठी ओलाव्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आता  १४ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावात कपात न करता खरेदी  करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१४ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावानुसार खरेदी करणारमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिले संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्यावतीने नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या  सोयाबीन खरेदीसाठी ओलाव्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आता  १४ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावात कपात न करता खरेदी  करण्यात येणार आहे. पूर्वी १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीनच ‘फेअर  अँव्हरेज कॉलिटी’च्या कक्षेत ग्राह्य धरण्यात येत होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी  मंगळवारी विविध विषयावर आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये १४ टक्के  आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावानुसार खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत.  याबाबत निर्णय झाल्यास सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार  आहे.  राज्यात यंदा अपुर्‍या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. शेतकरी  काढलेले सोयाबीन विकण्यासाठी बाजारात आणत असताना व्यापार्‍यांकडून  शासनाकडून निर्धारित ३0५0 पेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी सुरू  असल्याने लोकप्रतिनिधी आणि शेतकर्‍यांत रोषाचे वातावरण निर्माण झाले हो ते. त्यामुळे शासनाने नाफेडमार्फत राज्यात नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी  सुरू केली; परंतु या ठिकाणी ‘फेअर अँव्हरेज क्वॉलिटी’ अर्थात चांगल्या  दर्जाचा मालच मोजला जात असल्याने शेतकरी अडचणीत आले. नाफेडच्या  सोयाबीन खरेदीसाठी जास्तीत जास्त १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीनच  हमीभावाने खरेदी करण्यात येत असल्याने शेकडो शेतकर्‍यांना नोंदणी करून  आपला माल परत न्यावे लागत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घे तली. यामध्ये कृषी विभागाचे सचिव, महसूल आयुक्त, कृषी आयुक्त,  जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांचा  समावेश होता. या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाफेडच्या  खरेदीचा आढावा घेतला आणि सोयाबीन खरेदी करताना आर्द्रतेची अट शि िथल करून १२ टक्क्यांऐवजी १४ टक्के करण्याचे संकेत दिले. तथापि,  यासंदर्भात पणन महामंडळ प्रशासनाला लेखी आदेशच प्राप्त झाले नसल्याने  अद्यापही १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीनच नाफेडच्या केंद्रावर खरेदी  करण्यात येत आहे. 

शासनाकडून नाफेडच्या खरेदीसाठी १२ टक्क्यांऐवजी १४ टक्के आद्र्र ता असलेले सोयाबीन मोजून घेण्याचे संकेत दिल्याची माहिती आहे; परंतु  अद्याप आम्हाला यासंदर्भात लेखी आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे आम्ही  १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीनच खरेदी करीत आहोत. लेखी आदेश  प्राप्त होताच १४ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन खरेदी करण्यात येईल.-गजानन मगरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी  अकोला-वाशिम.

टॅग्स :Marketबाजारagricultureशेती