नाफेड खरेदीसाठी ३८४५ शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:08 PM2017-10-25T16:08:12+5:302017-10-25T16:09:47+5:30

वाशीम : 'महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत किमान आधारभूत दराने एफएक्यू प्रतीचे मूग, उडिद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

Online enrollment of 3845 farmers for Nafed purchase | नाफेड खरेदीसाठी ३८४५ शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी

नाफेड खरेदीसाठी ३८४५ शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी

Next
ठळक मुद्देप्रारंभाची प्रतिक्षाउडिद, मुग, सोयाबीनचा समावेश

वाशीम : 'महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत किमान आधारभूत दराने एफएक्यू प्रतीचे मूग, उडिद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यासाठी २३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ३,८४५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असून, यामधील २,२५० शेतकºयांची आॅनलाइन संगणकीय नोंदणी प्रक्रि या पूर्ण झाली आहे. आता शेतकºयांना नाफे डच्या खरेदीला सुरुवात होण्याची प्रतिक्षात लागली आहे. 

यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच पावसात खंड असल्यामुळे ६० दिवसांच्या अल्प कालावधीतील मूग व उडदासारखे पीक उद्ध्वस्त झाले. यामधून जे पीक वाचले ते आता मातीमोल भावाने विकले जात आहे. वास्तविकता यंदाच्या हंगामासाठी केंद्र शासनाने हमीभाव जाहीर केले आहेत. त्यानुसार मुगाला ५,५७५ यामध्ये २०० रुपये बोनस, तर उडदाला ५,४०० रुपये यामध्ये २०० रूपयांचा बोनस असे हमीभाव आहेत. तसेच सोयाबीनला ३,०५० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात शेतकºयांचा माल बाजारात आल्यावर एक ते दीड हजार रुपये प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली. बाजार समित्यांचे व्यापाऱ्यांवर नियंत्रण नसल्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असल्याने आता सहकार व पणन विभागाने नाफेडद्वारा शासकीय खरेदी केंद्रांवर तूर, उडीद व सोयाबीनची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील १५ ते २० दिवसापासून जिल्ह्यातील वाशीम, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, कारंजा या पाच केंद्रांवर शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपर्यंत वाशीम येथे १,२०० शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी पूर्ण झाली होती. मालेगाव येथे ७७५ शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे बाजार समितीकडे सादर केली आहेत. मात्र, किती शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली ? ही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. रिसोड येथे ४७० पैकी १५० शेतकºयांची संगणकीय नोंदणी झाली आहे. मंगरुळपीर येथे ६०० पैकी ५००, तर कारंजा येथे ८०० पैकी ४०० शेतकऱ्यांची संगणकीय नोंदणी झाली असून, नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासकीय खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, अनसिंग येथील शासकीय खरेदी केंद्रावर शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली की नाही, त्याची माहिती मिळू शकली नाही. 

Web Title: Online enrollment of 3845 farmers for Nafed purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी