मानोरा : स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व पांडुरंग ठाकरे वाणिज्य महाविद्यालयाला १ व २ फेब्रुवारी रोजी नॅक पीअर टीम भेट देऊन पाहणी करणार आहे. ही टीम दुसऱ्यांदा महाविद्यालयात येणार असून क्रीडा विभाग, रासेयो, ग्रंथालय यांची पाहणी करुन मूल्यांकन करणार आहे. दर पाच वर्षांत बंगळुरू येथील नॅकच्या माध्यामातून महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते. मागील पाच वर्षांपूर्वी महाविद्यालयास बी ग्रेड मिळाला होता. यावर्षी नॅक पीअर टीममधे सरदार पटेल विद्यापीठ गुजरात येथील माजी कुलगुरु प्रोफेसर शिशिर कुळकर्णी, चेन्नई येथील अन्ना विद्यापीठाच्या माजी प्रोफेसर हेमलता कोला, कर्नाटकच्या माजी प्राचार्या डॉ. पार्वती अपाईल यांचा समावेश आहे, अशी माहिती मासुपा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांनी दिली.
मासुपा महाविद्यालयास नॅक पीअर टीम देणार भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST