शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष, सदस्यांच्या परवानगीविना जमिनीचे अकृषक परवाने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 16:30 IST

मालेगाव(ंवाशिम): शहरात जमिनींना अकृषक परवाने देण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. मुख्याधिकाºयांनी हा निर्णय घेताना नगर पंचायतची सभा घेतली नाही, तसेच नगराध्यक्ष व सदस्यांची परवानगीही घेतली नाही.

मालेगावातील प्रकार: रद्द करण्यासाठी नगर पंचायतचा ठराव लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव(ंवाशिम): शहरात जमिनींना अकृषक परवाने देण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. मुख्याधिकाºयांनी हा निर्णय घेताना नगर पंचायतची सभा घेतली नाही, तसेच नगराध्यक्ष व सदस्यांची परवानगीही घेतली नाही. त्यामुळे  या जमिनींचे अकृषक परवाने, तसेच त्यावर अनधिकृतरित्या रोवलेले वीजखांब काढण्यासाठी नगर पंचायतने ठराव घेतला आहे. त्याशिवाय माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान सदस्य मिनाक्षी परमेश्वर सावंत आणि मदन राऊत यांनी महावितरणला निवेदन सादर करून हे खांब काढण्याची मागणी केली आहे.अनेक जमिनी अकृषक करून त्यावर भुखंड पाडण्याची प्रक्रिया शहरात सुरू आहे. काही ठिकाणी एकतर्फी निर्णय घेऊन जमिनी अकृषक केल्या आहेत आणि त्यावर अनधिकृतरित्या वीजखांबही रोवून त्यावर ताराही जोडल्या आहेत. नगरपंचायत मालेगाव अंतर्गत काही ठिकाणी मुख्याधिकारी तथा नियोजन प्राधिकारी नगरपंचायत मालेगाव यांनी काही व्यावसायिकांना नगरपंचायतच्या हद्दीतील सर्वे नंबर १२४ व १९० मधील जमीन निवासी प्रयोजनार्थ अभिन्यासाला मंजुरी प्रदान केली आहे; परंतु यात मुख्याधिकाºयांनी सर्वसाधारण सभेची, त्याचप्रमाणे अध्यक्ष व सदस्य यांची कोणतीही परवानगी प्राप्त केली नाही. त्यामुळे ही मान्यता रद्द करण्यात यावी यासाठी नगरपंचायत मालेगावने ठराव घेतला आहे. त्यासोबतच या अकृषक जमिनीवरील भूखंड परिसरात कोणताही ठराव न घेता वीजखांब रोवून त्यावर वीज जोडणीसाठी तारा लावल्या असल्याने हे खांब काढावे, असे निवेदन  महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना यांना निवेदन सादर केले आहे. (शहर प्रतिनिधी) 

मालेगाव शहरातील सर्व अकृषक परवाने नियमाच्या अधीन राहून दिले आहेत. त्याबाबत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन पडताळणी केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. -गणेश पांडे मुख्याधिकारी, नगर पंचायत मालेगाव   जमीन अकृषक करण्यासाठी नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केली असून, मुख्याधिकारी व नियोजन प्राधिकारी यांच्या परवानगीनेच कामकाज सुरू आहे, तसेच वीजखांबासाठी एक मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तारा जोडण्याचे काम सुरु आहे. उर्वरित कामांना लवकरच मान्यता घेऊन ते समोर सादर केले जाणार आहेत.-दिलीप हेडा, भूखंड व्यावसायी, मालेगाव 

टॅग्स :washimवाशिम