लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: येथून जवळच असलेल्या पिंगलाक्षीदेवी शेतशिवारात राहत असलेल्या मायलेकीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली. गोवर्धन येथील किसन अंभोरे यांनी फिर्याद नोंदविली की, त्यांच्या भावाची मुलगी पुष्पा महादा मकासरे ही कुटुंबासह रिसोड येथील राघोजी अंभोरे यांच्याकडे १0 वर्षांंपासून सालगडी म्हणून कामाला होती. हे कुटुंब पिंगलाक्षीदेवी शेतशिवारातील एका घरामध्ये वास्तव्याला होते. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तिची मुलगी नेहा मकासरे (वय १0 वर्षे) ही इंधनासाठी तुरीच्या काड्या आणण्यासाठी गेली असता उंदराने कुरतडलेला वायर तेथे लोंबकळत होता. सदर वायरास त्या मुलीचा हात लागल्याने तिला शॉक लागला. तिने आरडाओरड केल्याने तिची आई पुष्पा ही त्या ठिकाणी धावून आली. तिने मुलीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही विजेचा धक्का बसला. दरम्यान, दोघींवरही रिसोड येथे प्राथमिक उपचार करून वाशिम येथे हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
विजेच्या धक्क्याने मायलेकीचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:19 IST
रिसोड: येथून जवळच असलेल्या पिंगलाक्षीदेवी शेतशिवारात राहत असलेल्या मायलेकीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली.
विजेच्या धक्क्याने मायलेकीचा मृत्यू!
ठळक मुद्देपिंगलाक्षीदेवी शेतशिवारात घडली घटनापोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद