शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वणीत मुस्लीम बांधव एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

भारतीय मुस्लिम संघर्ष समितीच्या पुढाकारात, शहरातील सामाजिक संघटनांच्या सहभागात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केवळ वणीतीलच नव्हे, तर मारेगाव, राजूर (कॉलरी), मुकूटबन येथील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजता हा मोर्चा काढण्यात आला. येथील शासकीय मैदानावर दुपारी १२ वाजतापासूनच मुस्लिम बांधवांचे जत्थेच्या जत्थे मोर्चासाठी एकत्र येत होते.

ठळक मुद्देविराट मोर्चा : एनआरसीला विरोध, एसडीओंना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्याविरोधात शुक्रवारी वणीत हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले. मोर्चा काढून मुस्लिम बांधवांनी रोष व्यक्त केला. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत हा मोर्चा एसडीओ कार्यालयावर पोहोचला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.भारतीय मुस्लिम संघर्ष समितीच्या पुढाकारात, शहरातील सामाजिक संघटनांच्या सहभागात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केवळ वणीतीलच नव्हे, तर मारेगाव, राजूर (कॉलरी), मुकूटबन येथील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजता हा मोर्चा काढण्यात आला. येथील शासकीय मैदानावर दुपारी १२ वाजतापासूनच मुस्लिम बांधवांचे जत्थेच्या जत्थे मोर्चासाठी एकत्र येत होते. एनआरसीला मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांमध्ये प्रचंड रोष दिसून आला. मोर्चादरम्यान केंद्र सरकारविरूद्ध प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शुक्रवारी नमाज पठणानंतर शासकीय मैदानावर एकत्र आलेल्या मुस्लिम बांधवांनी दुपारी ३ वाजता मोर्चाला शिस्तबद्ध सुरूवात केली. हा मोर्चा टिळक चौक, आंबेडकर चौक, टागोर चौक, सर्वोदय चौक, नेताजी चौक, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, गांधी चौक, खाती चौक यामार्गे पुन्हा टिळक चौकात पोहोचला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने एसडीओ डॉ.शरद जावळे यांना निवेदन दिले. त्यानंतर टिळक चौकात सभा पार पडली. मोर्चाचे नेतृत्व रज्जाक पठाण, शाहीद खान, अ‍ॅड.जाहीद शरीफ, नईम अजीज, रफिक रंगरेज, इजहार शेख, जम्मू शेख, शमीम अहेमद, पुरूषोत्तम पाटील, अ‍ॅड.विप्लव तेलतुंबडे, मिलींद पाटील, मंगल तेलंग, सिद्धीक रंगरेज, जिया रब यांच्यासह अनेकांनी केले. मोर्चादरम्यान एसडीपीओ सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव, शिरपूरचे ठाणेदार सतीश चवरे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभागवणीच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम बांधवांच्या मोर्चात महिलांचाही विक्रमी सहभाग दिसून आला. केवळ सहभागच नाही, तर टिळक चौकात पार पडलेल्या सभेमध्ये महिलांनी आपल्या भाषणातून सरकारच्या धोरणावर कडाडून हल्ला चढविला. त्यात हिना खान, शिरीन खान, अ‍ॅड.फौजीया शेख, आचल पाटील, उजमा फातेमा अहेमद यांचा समावेश होता. दोन हजारपेक्षा अधिक महिलांनी या मोर्चात हजेरी लावली.

टॅग्स :Muslimमुस्लीम