शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारमधील हिंसाचाराचा मुस्लीम बांधवांकडून  निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:22 IST

बर्मा म्यानमार येथे रोहंग्या मुस्लिम बांधवांवर  होत असलेला अत्याचार आणि हिंसाचाराचा निषेध  वाशिम येथील मुस्लिम बांधवांकडून शुक्रवारी  करण्यात आला. या संदर्भात त्यांच्यावतीने  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करून, या प्रकरणी  भारत सरकारने हस्तक्षेप करून मुस्लिमांवरील अ त्याचार थांबविण्यासह देशात आलेल्या शरणार्थींना  आश्रय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांना निवेदनसरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: बर्मा म्यानमार येथे रोहंग्या मुस्लिम बांधवांवर  होत असलेला अत्याचार आणि हिंसाचाराचा निषेध  वाशिम येथील मुस्लिम बांधवांकडून शुक्रवारी  करण्यात आला. या संदर्भात त्यांच्यावतीने  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करून, या प्रकरणी  भारत सरकारने हस्तक्षेप करून मुस्लिमांवरील अ त्याचार थांबविण्यासह देशात आलेल्या शरणार्थींना  आश्रय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे  नमूद करण्यात आले आहे की, म्यानमार येथील  हिंसाचाराचा आम्ही भारतीय मुस्लिम समुदायाकडून  जाहीर निषेध करीत आहोत.  बर्मा येथे रोहंग्या मुस्लिम  समाजातील लहान मुले/ स्त्रियांवर गेले काही दिवसा पासून भीषण अत्याचार करून हिंसाचार करण्यात ये त आहे. यातील अनेक मुस्लिम बांधव आपला जीव  वाचवून भारतात आले आहेत. या शरणार्थी आणि  निष्पाम मुस्लिम बांधवांना केंद्र सरकारकडून त्वरित  मदत मिळवून द्यावी तसेच संयुक्त राष्ट्रे (यूनो) मार्फत  हस्तक्षेप करून त्वरित आळा घालण्यासाठी प्रयत्न  करावे. सर्व शरणार्थींना त्वरित वैद्यकीय मदत,  निवास, भोजन आदिंची सुविधा सरकारकडून  मिळावी. या निवेदनावर मो. जावेद पहेलवान, मौलवी  तस्लीम, मौलवी यासीन, अकिल चौहान, इरफान  कुरेशी, अबरार मिर्झा, आसिफ खान, मुफ्ती मोबीन,  युनूस मिर्झा, रोशन ठेकेदार, मो. मोईन, मुफ्ति आमिन,  शेख रहीम, शेख सुभान,  मिर्झा वहिद बेग आदिंची  स्वाक्षरी आहे. दरम्यान, शुक्रवारी वाशिम शहरातील  मुस्लिम बांधवांनी आपापली प्रतिष्ठाणे बंद ठेवत  म्यानमार हिंसाचारा निषेध नोंदविला.