शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खुन प्रकरणी काकडदाती येथील एकास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:17 IST

वाशिम - शेतीच्या जुन्या वादावरुन काकडदाती ता.जि.वाशिम येथे २८ जुन २०१५ रोजी घडलेल्या हत्याकांड प्रकरणात दोषी आढळुन आलेल्या राजु किसन राऊत या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तर किसन मारोती राऊत या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश के.के.गौर यांनी गुरुवारी सुनावली.

ठळक मुद्देदुस-या आरोपीस एक वर्षाचा कारावासजिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकालशेतीच्या वादातुन घडले होते हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - शेतीच्या जुन्या वादावरुन काकडदाती ता.जि.वाशिम येथे २८ जुन २०१५ रोजी घडलेल्या हत्याकांड प्रकरणात दोषी आढळुन आलेल्या राजु किसन राऊत या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तर किसन मारोती राऊत या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश के.के.गौर यांनी गुरुवारी सुनावली.वाशिम तालुक्यातील काकडदाती येथे २८ जुन २०१५ रोजी सदर घटना घडली होती.फिर्यादी गंगाबाई भारत सावंत वय ३५ वर्ष यांनी घटनेची फिर्याद दिली होती. घटनेच्या दिवशी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पती भारत सावंत यांच्यासोबत वाशिमहुन बाजार करुन घरी जातांना गावातील किसन मारोती राऊत याने आपल्या घरासमोरुन का चालले असे हटकल्यावरुन आम्ही आमच्या शेतातुन जात आहोत असे म्हटले.यावर आरोपी किसन राऊत याने काठीने हातावर मारले तर त्याचा मुलगा राजु किसन राऊत याने आपले पती भारत सावंत यांच्या डोक्यावर कुºहाडीने वार करुन त्यांना गंभीररित्या जखमी केले. तसेच संजय किसन राऊत,विमल किसन राऊत व नेहा राजु राऊत यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली असे गंगाबाई सावंत यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते. सदर घटनेत  गंभीररित्या जखमी झालेले भारत सावंत यांना त्वरित वाशिम येथे व नंतर अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथुन नागपुर येथे होप या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.उपचारादरम्यान ४ जुलै २०१५ रोजी भारत सावंत यांचा मृत्यु झाला.सदर प्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार विनायक जाधव व पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ देशमुख यांनी आरोपी किसन राऊत ,राजु राऊत, विमल राऊत,  संजय राऊत व नेहा राऊत यांच्याविरुध्द भादंवीचे कलम ३०२, १४७, १४८, ३२६, ५०४, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करुन प्रकरण न्याय प्रविष्ठ केले होते.सदर प्रकरणी एकुण १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावा व प्रत्यक्ष दर्शी ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश के.के.गौर यांनी आरोपी राजु राऊत यास कलम ३०२ मध्ये जन्मठेप व ५ हजार रुपये दंड दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावास तसेच किसन राऊत यास कलम ३२३ मध्ये एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर प्र्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता पि.एस.ढोबळे यांनी बाजु मांडली. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस उपनिरीक्षक दिलीप तेलगोटे यांनी सहकार्य केले.