शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मैदानात चिखल; रस्त्यावर भरला वाशिमचा बाजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 11:23 IST

पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने रविवार, १४ जून रोजी भाजीबाजार रस्त्यावर भरला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर वाशिम नगर परिषदेने शहरातील भाजीबाजार शहराबाहेर असलेल्या सुंदरवाटिकानजीकच्या मोकळ्या मैदानात हलविला. दरम्यान, दोन दिवसाच्या पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने रविवार, १४ जून रोजी भाजीबाजार रस्त्यावर भरला. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा झाला असून, अनेकांनी मास्क, रुमालचा वापरही केला नसल्याचे दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. शहरातील पाटणी चौकात भरणारा भाजीबाजार विविध ठिकाणी विभागला होता. त्यानंतर शहराबाहेर सुंदरवाटिका आणि लाखाळा परिसरात जूने आरटीओ कार्यालयाच्या प्रांगणात हा भाजीबाजार हलविण्यात आला. दोन दिवसाच्या पावसामुळे सुंदरवाटिकानजीकच्या मैदानात चिखल झाला. त्यामुळे १४ जून रोजी सुंदरवाटिकानजीक ते जवाहर नवोदय विद्यालय या दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरच भाजीबाजार भरला. विविध प्रकारच्या भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. फिजिकल डिस्टन्सिंगही पाळण्यात आले नाही तसेच अनेकांनी मास्क किंवा रुमालचा वापरही केला नाही. काही विक्रेत्यांनीदेखील मास्क किंवा रुमालचा वापर केला नसल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे ठरत आहे. धोका अजून टळला नाहीजिल्हयात परराज्य, परदेशातून मोठ्या संख्येने नागरीक येत आहेत. यापैकी काही जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. समूह संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्गामुळे नागरिकांनी सतर्क राहावेजिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे आवश्यक आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले.

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार