शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो महाघोटाळा : ८६ ग्रामपंचायतींमधील कामांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 14:43 IST

३ डिसेंबरपासून चौकशी प्रक्रियेस सुरूवात होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरून विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी तालुक्यातील संबंधित ८६ ग्रामपंचायतींच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी अकोला जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे १० पथक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार, ३ डिसेंबरपासून चौकशी प्रक्रियेस सुरूवात होणार आहे.मालेगाव तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या बहुतांश कामांचा दर्जा निकृष्ट असून अनेक कामे कागदोपत्रीच उरकण्यात आली आहेत. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या पथकाने वाघळूद, ब्राम्हणवाडा यासह इतर काही गावांमधील कामांची चौकशी केली असता, त्यात अनयिमितता व गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मालेगाव तालुक्यात इतरही अनेक ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये प्रचंड घोटाळा झाला असून विशेष तपासणी व सखोल चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावरून मालेगाव तालुक्यातील सर्व ८६ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या रोहयोच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी पारित केले. त्यासाठी विशेष पथक गठीत करण्यात आले आहे.

भ्रष्टाचारी कारवाईच्या ‘रडार’वरमालेगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अनियमितता झालेली आहे. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन आता चौकशी होणार असून भ्रष्टाचारी कारवाईच्या ‘रडार’वर येणार आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत