शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

एमपीएसएसी आणि रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:42 IST

गत काही महिन्यांपासून एमपीएससीच्या परीक्षांचा मोठा घोळ सुरू आहे. आतापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षा वेगवेगळ्या कारणांमुळे पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली ...

गत काही महिन्यांपासून एमपीएससीच्या परीक्षांचा मोठा घोळ सुरू आहे. आतापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षा वेगवेगळ्या कारणांमुळे पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीने राज्यसेवा पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा रेल्वेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. रेल्वेकडून विविध पदांसाठी देशभरात विविध केंद्रांवर पाच टप्प्यांत परीक्षा घेण्यात येत आहेत. येत्या २१ मार्चला देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे रेल्वेसह एमएपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता यातील कोणतीही एकच परीक्षा देणे शक्य होणार आहे.

--------------------

रेल्वेच्या परीक्षा पूर्वनियोजित

रेल्वेच्या ३२ हजार २०८ जागांसाठी पाच टप्प्यांत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत. सध्या पाचव्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहेत. देशभरातील १९ लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. रेल्वेची पूर्व नियोजित परीक्षा असतानाही एमपीएससीनेही त्याच तारखेला परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी एका परीक्षेपासून वंचित राहणार आहेत.

------------------

लॉकडाऊनचा विद्यार्थ्यांना बसणार फटका

कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तसेच हॉटेल बंद राहणार असल्याने घरच्या शिदोरीवरच परीक्षा द्यावी लागणार आहे. लॉकडाऊन असलेल्या शहरामध्ये राहण्याची सोय होणार नसल्याने परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.

----------------

विद्यार्थ्यांना बसला भुर्दंड

लॉकडाऊननंतर शहरांमध्ये अभ्यास करण्यासाठी गेलेले विद्यार्थी गावी परतले आहेत. या विद्यार्थ्यांनी १४ मार्चला होणाऱ्या परीक्षेला जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षणही केले होते. मात्र, ऐनवेळेवर एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना नाहकचा भुर्दंड बसला आहे, तर आता ही परीक्षा २१ मार्च रोजी घेण्याचे जाहीर केल्याने त्यांना पुन्हा आरक्षण करावे लागत असून, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.