लोकमत न्यूज नेटवर्कहराळ : येथे १ जुनपासून विविध मार्गाने शेतकऱ्यांचे प्रश्न शासनास कळविण्यासाठी हराळ येथील युवा शेतकरी तथा स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने संपात सामील होवुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जुन ते ७ जुनपर्यंत विविध मार्गाने शेतकऱ्यांच्या अडचणी दाखविण्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने केले. ६ जुनला ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करुन कर्ज माफीचा घोषणा करण्यात आल्या व सरपंच यांच्या मार्फत शासनास कळविण्यात आले.१ जुनला आठवडी बाजार बंद तर गावातील भाजी विक्रेते व शेतकऱ्याने गावातच भाजीविक्री करावी तसेच दुध गावातच वाटप करण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांना विनंती करण्यात आली. ५ जुनला संपूर्ण गावताील व्यावसायीक यांनी आपले प्रतिष्ठा बंद ठेवुन शेतकऱ्यांच्या पाठींबा दिला. या कार्यक्रमाला स्वाभीमानी शेतकरी सघटना हराळचे सर्व कार्यकर्ते हजर होते. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे रिसोड तालुका अध्यक्षपदी अविनाश बिल्लारी, प्रमोद बिल्लारी , तान्हाजी बिल्लारी, दत्तराव बिल्लारी, पितु सरकटे, बाबुराव पाटील सरकटे, संजय टाले, गणेश खरात, गोपाल सरकटे, तेजराव खैरे, प्रल्हाद घुगे, लक्ष्मण महाकाळ, विजु सरकटे, गणेश बिल्लारी, गणेश तुरुकमाने, व सर्व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: June 6, 2017 19:47 IST