शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे फळप्रक्रिया व संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या हालचाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 19:28 IST

वाशिम : वाशिम येथे फळप्रक्रिया व फळसंशोधन केंद्र स्थापन करावे अशी मागणी आमदार अमित झनक यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे (पीकेव्ही) लावून धरल्यानंतर कार्यकारी परिषदेच्या सभेत यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्दे‘पीकेव्ही’च्या सभेत ठराव मंजूर आमदार झनक यांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम येथे फळप्रक्रिया व फळसंशोधन केंद्र स्थापन करावे अशी मागणी आमदार अमित झनक यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे (पीकेव्ही) लावून धरल्यानंतर कार्यकारी परिषदेच्या सभेत यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. सदर प्रस्ताव आता कृषी विद्यापिठातर्फे मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला जाणार असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत. प्रस्तावाच्या मान्यतेसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार झनक यांनी शुक्रवारी सांगितले.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेची सभा ३ नोव्हेंबर रोजी अकोला येथे पार पडली. या सभेत आमदार तथा कार्यकारी परिषदेचे सदस्य अमित झनक यांनी वाशिम येथे फळप्रक्रिया व फळसंशोधन केंद्र निर्माण करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. वाशिम जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यापैकी असून विकासाच्या दृष्टीने मागासलेला आहे. जिल्ह्यात फळबागेखालील क्षेत्रफळ अत्यल्प असून, सोयाबीन तूर, गहू, हरबरा, कापूस, ज्वारी अशी प्रमुख पिके घेतली जातात. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. परिणामी शेतकºयांनी फळबागोकडे वळणे आवश्यक ठरू पाहत आहे. हलक्या व मध्यम जमिनीवर सिताफळ, लिंबू, डाळींब, पेरू, संत्रा, इत्यादी फळपिकांचे उत्पन्न चांगल्या प्रमाणात होऊ शकते. योग्य दरात फळबागेसाठी रोपे उपलब्ध करुन दिल्यास व त्यांना वेळोवेळी आधुनिक व सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती दिली तर फळबागेखालील क्षेत्रफळात वाढ होऊ शकतो, हा मुद्दा अमित झनक यांनी निदर्शनात आणून दिला.वाशिम येथे कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र असून तेथे विद्यापिठाची ४३.४० हेक्टर जमीन आहे. या जमिनीपैकी २० हेक्टर जमिनीवर फळ संशोधन व फळप्रक्रिया केंद्र उभारल्या जाऊ शकते. वाशिम येथे फळसंशोधन केंद्र उभारल्या गेल्यास फळबाग निर्मिती व फळप्रक्रियेवर संशोधन केल्या जाउ शकते. फळबागेसंदर्भात अनेक उद्दिष्ट साध्य होऊ शकतील, ही बाबत आमदार झनक यांनी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेच्या सभेत निदर्शनास आणून दिली. वाशिम येथे फळप्रक्रिया व फळ संशोधन केंद्र स्थापन करण्यासंबंधीचा ठराव मांडला असता, सदर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यासंदर्भातचा प्रस्ताव शिफारसीसह शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात यावा, अशी मागणी झनक यांनी कुलगुरूकडे केली. याबाबत विद्यापीठ सकारात्मक असल्याची ग्वाही कुलगुरूंनी दिल्याने आणि शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही अमित झनक यांनी दिल्याने फळप्रक्रिया व संशोधन केंद्र स्थापन होण्याच्या जिल्हावासियांच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेती