शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आईसह चिमुकली विहिरीत पडली; आई बचावली, चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:57 IST

माता वैशाली सुखरूप तर चिमुकली अनुष्काचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची ह्रदयद्रावक घटना १० नोव्हेबर रोजी सकाळी सहा वाजतादरम्यान मारसुळ येथे उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मौजे मारसुळ येथील वैशाली निखिल घुगे वय (२५) हि महिला आपल्या चार महिन्यांच्या चिमुकलीसह गावानजीकच्या विहिरीत पडली. यामध्ये माता वैशाली सुखरूप तर चिमुकली अनुष्काचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची ह्रदयद्रावक घटना १० नोव्हेबर रोजी सकाळी सहा वाजतादरम्यान मारसुळ येथे उघडकीस आली.पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार वैशाली हि सकाळी झोपेतून उठल्यानंतर मुलगी अणुष्का (वय ४ महिने) हिला सोबत घेऊन पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली होती पाण्याचे भांडे विहिरीचे काठावर ठेवून अण्षुकाला बाजुला ठेवत असताना वैशालीचा तोल जाऊन ति मुलीसह विहिरीत पडली. पडताक्षणीच मुलगी हातातुन सुटल्याने ति पाण्याच्या तळाशी गेली, परंतु वैशालीला ब-यापैकी पोहणे येत असल्याने तिने पोहुन काठावरील कंगणी पकडून तिचा आधार घेतला, तर मुलगी अणुष्का हि तिच्या डोळ्यादेखत मृत्यूच्या दाढेत खेचल्या गेली. सकाळी गावातील काही महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या असता त्यांना वैशाली विहिरीत आढळून आली. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन वैशालीला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढले. घटनेची माहिती मालेगाव पोलीसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन चिमुकली अनुष्काचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी मालेगाव येथे पाठविण्यात आला. वैशाली हिला दुसरी एक पाच वर्षांची मुलगी असल्याचे समजते. चिमुकली अनुष्काच्या दुर्दैवी मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेबाबत ग्रामस्थामध्ये अनेक शंका कुशंका चर्चील्या जात असुन या प्रकरणाचा अधिक तपास मालेगावचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार उत्तम राठोड शिपाई अमोल पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिम