ठळक मुद्दे१९ वर्षीय युवतीचा विनयभंग कारंजा पोलिसांनी दाखल केला २९ वर्षीय युवकाविरूद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : १९ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी कारंजा येथील २९ वर्षीय युवकाविरूद्ध कारंजा पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला. शहरातील युवती स्वत:च्या घरातील स्नानगृहात स्नान करीत असताना ४ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास भारतीपुरा येथील एज्जाज खॉन आबेद खॉन याने डोकावून पाहत विनयभंग केला. याप्रकरणी आरोपीविरूद्ध ३५४, ४४८ भादंवीनुसार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी सोनाली गुल्हाने करीत आहेत.