कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनलॉकच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू असतांना आणि इतर सर्व बाबींना परवानगी देतांना सर्वधर्मीयांची धार्मिक स्थळे उघडण्यास सरकारने अद्यापही परवानगी दिली नाही. त्यामुळे भाविक भक्तांसोबतच धार्मिक स्थळांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचा कोंडमारा होत असल्यामुळेच हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर, मनविसे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, तालुका अध्यक्ष मनोज खडसे, शिवा इंगोले, मनविसे जिल्हा सचिव अमोल गाभणे, शहर अध्यक्ष गजू धोंगडे, रवी वानखेडे, कृष्णा इंगळे, हनुमान घोडे, संध्या उसरे, विनोद उसरे, दिलीप शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल मुळे, फकिरा कर्डिले, बबलू राऊत, प्रवीण घोडे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, शहर उपाध्यक्ष बाळू विभुते, शहर सचिव निखिल बुरकुले, तालुका उपाध्यक्ष आबा सोनटक्के, अनंता ढोके, मानोरा शहर अध्यक्ष महादेव भस्मे, अशोक इंगळे आदी पदाधिकारी व मनसैनिकांनी सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बालाजी मंदिरासमोर मनसेचे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST