शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिज उत्खनन प्रशासनाच्या ‘रडार’वर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:32 IST

वाशिम: प्रशासनाला अंधारात ठेवून निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन करणारे महसूल प्रशासनाच्या रडारवर आहेत. त्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत असून, जिल्ह्यात असे प्रकार शोधून काढण्यासाठी प्रादेशिक खनिकर्म विभागामार्फत पाहणी करण्याचा प्रस्ताव खनिकर्म अधिकार्‍यांकडून पाठविण्यात आला असल्याची माहिती मंगळवारी प्राप्त झाली.   

ठळक मुद्देप्रशासनाची तयारीजिल्ह्यात येणार प्रादेशिक खनिकर्म विभागाचे पथक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: प्रशासनाला अंधारात ठेवून निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन करणारे महसूल प्रशासनाच्या रडारवर आहेत. त्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत असून, जिल्ह्यात असे प्रकार शोधून काढण्यासाठी प्रादेशिक खनिकर्म विभागामार्फत पाहणी करण्याचा प्रस्ताव खनिकर्म अधिकार्‍यांकडून पाठविण्यात आला असल्याची माहिती मंगळवारी प्राप्त झाली.   जिल्ह्यातील अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन करणार्‍या लोकांविरुद्ध शासन कडक कारवाई करणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील अधिकृत खदानींसह इतर ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन होत आहे काय, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाकडून प्रादेशिक पथकांमार्फत तपासणी करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात जवळपास ५0 च्यावर गौण खनिजाच्या खदानी आहेत. या सर्व खदानींची पाहणी वर्ष दोन वर्षांनी खनिकर्म अधिकार्‍यांकडून करण्यात येते. ही कारवाई जिल्हा स्तरावरील पथकांकडून करण्यात येते. आता प्रादेशिक पथकाद्वारे ही पाहणी करण्याचा प्रस्ताव खनीकर्म अधिकार्‍यांकडून पाठविण्यात आला आहे. प्रादेशिक पथकाकडून करण्यात आलेल्या पाहणीत र्मयादेपेक्षा किंवा निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक उत्खनन झाल्याचे आढळल्यास, तसेच अनधिकृत ठिकाणी गौण खनिज उत्खनन झाल्याचे दिसल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. नियमानुसार किमान ५ वर्षांच्या कालावधीसाठी गौण खनिज उत्खननासाठी खदानी लीजवर देण्यात येतात. या खदानीतून गौण खनिजाचे उत्खनन करण्यापूर्वी  जिल्हा खनिकर्म विभागात रक्कम भरुन रॉयल्टीच्या पासेस घ्याव्या लागतात. त्यानंतरच गौण खनिज खदानीतून काढून ग्राहकांना दिल्या जाते. ज्या वाहनांमधून गौण खनिजांची वाहतूक केल्या जाते, त्या वाहनधारकांकडेही सदर पास असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे अशी पास नसल्यास गौण खनिजाचे अवैध वाहतूक करण्याप्रकरणी १0 हजारांचा दंड आकारण्यात येतो, साधारणपणे प्रत्येक वाहनामागे ५0 हजारांएवढा दंड आकारण्यात येतो. आता जिल्ह्यातील खदानीचे प्रादेशिक पथकाकडून मोजमाप करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाकडूनच प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याने. जिल्ह्यात नियमबाह्य पद्धतीने किंवा निर्धारित क्षेत्रापेक्षा अधिक गौण खनिजाचे उत्खनन करणार्‍यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे दिसत आहे. या अनुषंगाने महसूल बुडविणार्‍या खदानधारकांवरही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आता असे प्रकार करणारे नमके किती हे कारवाईनंतरच स्पष्ट होईल.

प्रादेशिक पथकांकडे ‘कंट्रोल मॅपिंग’गौण खनिजाचे उत्खनन किती करण्यात आले हे माहिती झाल्याशिवाय कार्यवाही केली जाऊ शकत नाही. हे माहीत करण्यासाठी प्रादेशिक पथकांकडे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ आणि अद्ययावत यंत्रणा, तसेच साहित्याची उपलब्धता असते. त्यामुळे कोणत्या खदानीतून किती गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले, ते निश्‍चित कळू शकते आणि त्यामध्ये नियमबाह्य पद्धतीने किंवा प्रमाणापेक्षा अधिक गौण खनिजाचे उत्खनन झाल्यास अधिक उत्खननापोटी किती आकारायचा, दंड आकारायचा की खदानीची मान्यता रद्द करायची, ते ठरविले जाते. 

जिल्ह्यातील गौण खनिजांच्या खदानींची तपासणी आणि मोजमाप प्रादेशिक पथकामार्फत करण्यासाठी आम्ही वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविलेला आहे. तथापि, वरिष्ठ स्तरावरून अद्याप तपासणीचा कार्यक्रम निश्‍चित झालेला नाही तरी, ही तपासणी मात्र होणार आहे. - डॉ. विनय राठोडखनिकर्म अधिकारी, वाशिम-